गणेश महाराजांवरील हल्ल्याप्रकरणी १४ गावकऱ्यांना अटक; अज्ञातांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 01:08 AM2020-12-28T01:08:39+5:302020-12-28T07:06:45+5:30

गणेश महाराजांनी वादादरम्यान दोन्ही हातात तलवार घेऊन धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी सांगितले. 

14 villagers arrested in attack on Ganesh Maharaj; Crimes against the unknown | गणेश महाराजांवरील हल्ल्याप्रकरणी १४ गावकऱ्यांना अटक; अज्ञातांवर गुन्हे

गणेश महाराजांवरील हल्ल्याप्रकरणी १४ गावकऱ्यांना अटक; अज्ञातांवर गुन्हे

googlenewsNext

पैठण : तालुक्यातील श्रीराम टेकडी येथील गणेश महाराजांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी १४ जणांना अटक केली. महाराज आणि निलजगावातील गावकऱ्यांनी रविवारी बिडकीन पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या. यावरून निलजगावच्या अज्ञात २५ जणांसह गणेश महाराजांविरोधात बिडकीन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गणेश महाराजांवर औरंगाबादेत उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. गणेश महाराजांनी वादादरम्यान दोन्ही हातात तलवार घेऊन धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी सांगितले. 

गणेश महाराजांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी त्यांची गाय परिसरातील मका पिकात गेली असता मी गाईला मूर्ख, असे संबोधले; परंतु तेथे हजर असलेल्या वारकऱ्यांनी ते स्वतःवर घेत २५ ते ३० जणांनी मला मूर्ख कुणाला म्हणता, असे विचारत दगड, काठ्या व कुऱ्हाडीने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. मला टेकडीवरून ढकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शुक्रवारी मोक्षदा एकादशीला  मेहरबान नाईक तांडा (ता. पैठण) भागातील श्रीराम टेकडीवर गणेश महाराज आणि निलजगाव येथील गावकऱ्यांत बाचाबाची होऊन वादाचे पर्यावसान हल्ल्यात झाले. 

Web Title: 14 villagers arrested in attack on Ganesh Maharaj; Crimes against the unknown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस