१४ देशी पिस्तूल, १६० काडतूस जप्त; झारखंड राज्यातील रांची दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 18:12 IST2021-11-24T17:43:36+5:302021-11-24T18:12:49+5:30
Ats Action : संग्रामपूर तालुक्यातील टूनकी येथे मध्यप्रदेशातील तीन आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्या कडून तब्बल १४ देशी पिस्तूल व १६० जिवंत काडतुसे जप्त केली.

१४ देशी पिस्तूल, १६० काडतूस जप्त; झारखंड राज्यातील रांची दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
संग्रामपूर (जि. बुलडाणा): झारखंड दहशतवाद विरोधी पथकाने गोपनीयता बाळगत संग्रामपूर तालुक्यातील टूनकी येथे मध्यप्रदेशातील तीन आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्या कडून तब्बल १४ देशी पिस्तूल व १६० जिवंत काडतुसे जप्त केली. कारवाई २० नोव्हेंबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास टूनकी बस थांब्यामागे करण्यात आली.
झारखंड दहशतवाद विरोधी पथकाचे आयपीएस विश्वजीत कुमार यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेशातील तीन आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्याकडून घातक हत्यारे जप्त केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. झारखंड राज्यात नक्षलवाद्यांकडून घातक शस्त्रे पकडण्यात आली होती. पकडण्यात आलेली घातक शस्त्रे मध्यप्रदेशातील पाचोरी येथील असल्याचे आढळून आले. त्या अनुषंगाने झारखंड दहशतवादी पथकाने पाचोरी येथे संपर्क साधून कथीत डिल केली. त्या कथीत डिलमध्ये देसी पिस्तूल व जिवंत काडतुसांची मागणी केल्याने आरोपी दहशतवादी पथकाच्या जाळ्यात अडकले. मात्र यातील मूख्य तस्कर पोलिसांच्या हाती लागला नसून वीस ते बावीस वर्ष वयोगटातील मंजूरीने काम करणारे आरोपींना ताब्यात घेण्यात आले