ॲथलिटवर अत्याचारप्रकरणी १४ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 07:24 IST2025-01-13T07:24:20+5:302025-01-13T07:24:29+5:30
या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक केली आहे.

ॲथलिटवर अत्याचारप्रकरणी १४ जणांना अटक
पथनमथिट्टा (केरळ) : जिल्ह्यातील दलित ॲथलिट मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक केलेल्या १४ आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक केली आहे. या प्रकरणी २ पोलिस ठाण्यात ९ एफआयआर दाखल केले आहेत. १८ वर्षांची पीडिता तक्रारीत म्हणाली आहे की, वयाच्या १३ व्या वर्षापासून ६२ जणांनी तिचे लैंगिक शोषण केले. मुलीवर तिच्या क्रीडा प्रशिक्षकांनी, सहकारी खेळाडूंनी आणि वर्गमित्रांनी अत्याचार केले होते.