भावंडांमध्ये भांडण झालं अन् वडील रागावले; संतापलेल्या मुलानं त्यानंतर जे केलं ते ऐकून धक्काच बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 05:38 IST2021-05-21T05:38:30+5:302021-05-21T05:38:44+5:30

१३ वर्षांच्या मुलाने चाकू खुपसून केली वडिलांची हत्या

A 13-year-old boy stabbed his father to death in Pune | भावंडांमध्ये भांडण झालं अन् वडील रागावले; संतापलेल्या मुलानं त्यानंतर जे केलं ते ऐकून धक्काच बसेल

भावंडांमध्ये भांडण झालं अन् वडील रागावले; संतापलेल्या मुलानं त्यानंतर जे केलं ते ऐकून धक्काच बसेल

पुणे : भावंडांमध्ये झालेल्या भांडणांमध्ये वडील रागविल्यामुळे १३ वर्षांच्या मुलाने वडिलांच्या पोटात चाकू खुपसून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना आंबेगाव येथील जांभूळवाडी रोड येथे घडली. भारती विद्यापीठ पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
दस्तगीर इमाम शेख (४०, रा. सिद्धिविनायक सोसायटी, जांभूळवाडी) असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली.

या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दस्तगीर हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. 

भांडणाबद्दल वडिलांनी रागावून मारले अन्... 
दस्तगीर यांना चार मुले आहेत. मोठा मुलगा व त्याच्या बहिणीत भांडण झाले. मुलाला भांडणाबद्दल रागावून त्यांनी मारले. रागाच्या भरात घरातून चाकू आणून त्याने वडिलांच्या पोटात चाकू खुपसला. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले.

 

Web Title: A 13-year-old boy stabbed his father to death in Pune

टॅग्स :Policeपोलिस