शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

स्टंट आला अंगलट! नसतं धाडस पडलं महागात; गळफास लागून १३ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 17:00 IST

मुलाच्या आई-वडिलांनुसार आठव्या वर्गात शिकत असलेला मुलगा स्टंटचे व्हिडीओ बनवत होता. ते व्हिडीओ तो वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत होता. 

गुजरातच्या सुरत शहरात १३ वर्षीय एका मुलाला श्वास गुदमरून मृत्यू झालाय. तो घरात कथितपणे एक स्टंट करत असताना ही घटना घडली. हा स्टंट करत असताना दोरी त्याच्या गळ्याभोवती आवळली गेली आणि त्याला गळफास बसला. एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुलाच्या आई-वडिलांनुसार आठव्या वर्गात शिकत असलेला मुलगा स्टंटचे व्हिडीओ बनवत होता. ते व्हिडीओ तो वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत होता. 

सरथाना पोलीस स्टेशनचे इन्सेक्टर एम के गुर्जर म्हणाले की, ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. हा मुलगा त्याच्या घराच्या व्हऱ्यांड्यातील एका भींतीवरील खुंटीवर बांधलेल्या दोरीला लटकलेला आढळून आला. त्यांनी सांगितले की, 'आम्हाला वाटतं की ही घटना सायंकाळी पाच दरम्यान घडली असावी. त्यावेळी घरातील इतर लोक घरात नव्हते. मुलगा सायंकाळी साधारण साडे सहा वाजता दरम्यान दोरीला लटकलेला आढळून आला. त्यानंतर त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. (हे पण वाचा : विनाकारण फिरणाऱ्यांना बेडूक बनवून लाथ मारलेली; कोरोनाबाधिताकडून 'त्या' तहसीलदाराला मारहाण)

ते म्हणाले की, प्राथमिक पाहणीत हे समजलं आणि मुलाच्या आई-वडिलांनी सांगितलं की, मुलाचा मृत्यू स्टंट केल्याने झाला आहे. पोलीस या घटनेचा आत्महत्येच्या दृष्टीनेही तपास करत आहेत. कारण त्याच्या आई-वडिलांनी नुकतीच त्याला मोबाइल फोन वापरण्यास मनाई केली होती. (हे पण वाचा : अविश्वसनिय! सून आणि सासऱ्याच्या लव्हस्टोरीनं घेतला मुलाचा जीव, वाचून पायाखालची जमीनच सरकेल...)

मृतकाच्या मित्रांनी आणि आई-वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, त्याला गाण्याची, डान्सची आणि स्टंट करण्याची आवड होती. पोलीस म्हणाले की, 'असंही होऊ शकतं की दोरीसोबत स्टंट करत असताना मुलाचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईने त्याचा फोन परत घेतला होता. त्यामुळे असंही होऊ शकतं की त्याने रागाच्या भरात आत्महत्या केली असावी'. 

टॅग्स :GujaratगुजरातDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी