विनाकारण फिरणाऱ्यांना बेडूक बनवून लाथ मारलेली; कोरोनाबाधिताकडून 'त्या' तहसीलदाराला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 02:03 PM2021-05-13T14:03:46+5:302021-05-13T14:04:58+5:30

Tahasildar bajrang bahadur. who kicked violators in curfew: याच तहसीलदारांनी 2017 मध्ये त्यांच्या वाढदिवसावेळी तलवारीने केक कापला होता व उपस्थित तरुणाने पिस्तूलमधून हवेत गोळीबार केला होता.

Depalpur tahasildar bajrang bahadur beaten by corona Patient and his son in Indore | विनाकारण फिरणाऱ्यांना बेडूक बनवून लाथ मारलेली; कोरोनाबाधिताकडून 'त्या' तहसीलदाराला मारहाण

विनाकारण फिरणाऱ्यांना बेडूक बनवून लाथ मारलेली; कोरोनाबाधिताकडून 'त्या' तहसीलदाराला मारहाण

Next

मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये नेहमी चर्चेत असणाऱ्या तहसीलदारांना कोरोनाबाधिताने (Corona Patient) मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तहसीलदारांनी काही दिवसांपूर्वी विनाकारण फिरणाऱ्या लोकांना बेडूक उड्या मारायला लावत ढोल ताशे वाजवत वरात काढली होती.  यावेळी एकाला बेडूक उड्या मारायाला जमत नसल्याने पाठीमागून या तहसीलदारांनी त्याच्यावर लाथ मारली होती. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. (tahasildar bajrang bahadur beaten by corona Patient and his son in Indore.)


या व्हिडिओवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात होता. यामुळे मानवाधिकार आयोगानेही त्यांना नोटीस पाठविली होती. तसेच गुन्हा दाखल केला होता. 10 मे पर्यंत मानवाधिकार आयोगाकडे उत्तर द्यायचे होते. तसेच याच तहसीलदारांनी 2017 मध्ये त्यांच्या वाढदिवसावेळी तलवारीने केक कापला होता व उपस्थित तरुणाने पिस्तूलमधून हवेत गोळीबार केला होता. (bajrang bahadur was seen kicking violators in curfew.)


आता घडलेली घटना अशी की, खजराया गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या मुलासोबत मिळून या देपालपूरचे तहसीलदार बजरंग बहादुर (bajrang bahadur) व त्यांच्यासोबत गेलेल्य़ा पटवारीला मारहाण केली आहे. हा व्यक्ती कोरोनाबाधित होता आणि तहसीलदार त्याला नेण्यासाठी पटवारी प्रदीप चौहाण यांच्यासह त्याच्या गावी गेले होते. तेव्हा या तहसीलदारांना रुग्ण आणि त्याच्या मुलाने ठोसे लगावले. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


घटना बुधवारी सायंकाळची आहे. तहसीलदार  बजरंग बहादुर एक टीम घेऊन 52 वर्षीय कोरोनाबाधित गब्बू यांना कोविड सेंटरमध्ये भरती करण्यासाठी आले होते. गब्बू तीन दिवसांपासून बाधित होता. तहसीलदारांना पाहून गब्बू पळू लागला. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्याचा 26 वर्षीय मुलगा अर्जुन तेथे आले आणि तहसीलदारांवर हल्ला केला. त्यांच्या तोंडावर बुक्के लगावले. पटवारीने त्याला विरोध करताच गब्बू आला आणि त्याने पटवारीलादेखील मारहाण केली. 

Web Title: Depalpur tahasildar bajrang bahadur beaten by corona Patient and his son in Indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.