उल्हासनगरात 13 मोबाईल, गांजा जप्त; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 10:01 IST2020-02-11T09:58:21+5:302020-02-11T10:01:30+5:30
हाजीमलंग बस स्टँडवर सोमवारी मध्यरात्री उभ्या असलेल्या दोन तरुणांकडून 13 मोबाईल व 300 ग्राम गांजा जप्त केला.

उल्हासनगरात 13 मोबाईल, गांजा जप्त; दोघांना अटक
उल्हासनगर : हाजीमलंग बस स्टँडवर सोमवारी मध्यरात्री उभ्या असलेल्या दोन तरुणांकडून 13 मोबाईल व 300 ग्राम गांजा जप्त केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांनाअटक केली.
शहरातील हिललाईन पोलिसांनी सोमवारी रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान हाजीमलंग बस स्टँडवर उभ्या असलेल्या दोन संशयितांची अंगझडती घेतली असता तौसिम सलीम सय्यद-29 यांच्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीत एकूण 33 हजाराचे तब्बल विविध कंपनीचे 13 मोबाईल आढळून आले आहे. तर आमिर सलीम सय्यद-19 यांच्याकडे 7 हजार किंमतीचा 300 ग्राम गांजा जप्त केला.
पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
गेल्या महिन्यात याच परिसरातून पोलिसांनी दोघा तरुणांकडून तब्बल 3 किलो पेक्षा जास्त गांजा जप्त केला होता.