शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

चिडे हत्या प्रकरणात १३ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 05:11 IST

मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दारू माफियाच्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांना चिरडून ठार केले. या हत्या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांविरुध्द गुन्हे दाखल केले असून पाच जणांना अटक केली आहे.

ब्रह्मपुरी (चंद्रपूर)  - मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दारू माफियाच्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांना चिरडून ठार केले. या हत्या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांविरुध्द गुन्हे दाखल केले असून पाच जणांना अटक केली आहे.मौशी रस्त्याने पवनी - तोरगाव मार्गे दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती ठाणा प्रभारी चिडे यांना मिळताच ते पीएसआय ए.एस. मलकापूरे , संदीप कोवे आणि पितांबर खरकाटे, रामकृष्ण बोधे यांना सोबत घेऊन मौशीकडे निघाले. यादरम्यान दारूची वाहतूक करणारी गाडी थांबली. त्यामुळे पोलीस गाडीतून खाली उतरले. तेवढयात दारू माफियांनी गाडी रिव्हर्स घेऊन छत्रपती चिडे यांना चिरडले.याप्रकरणी पोलिसांनी १३ जणांविरुध्द अपराध क्र. व कलम ४३९/१८ कलम ३०२, ३०६, ३४३, ३३२, ३३३, १२०, सह कलम ६५ अ ८२, ८३ मदाका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून काही रडारवर आहेत. पुढील तपास ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी करीत आहेत.१० लाखांचे अर्थसहाय्यदिवंगत पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रूपयांचे अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी चिडे कुटुंबीयांना १० लाख रूपयांचे अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय जाहीर केला. लवकरच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार छत्रपती चिडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन अर्थसहाय्याचा धनादेश प्रदान करतील.नाकाबंदीदरम्यान पोलीस बाळगणार शस्त्रचंद्रपूर जिल्ह्यात नाकाबंदीदरम्यान पोलीस शस्त्र बाळगणार असून त्यांच्यावर जर कुणी प्राणघातक हल्ला चढवत असेल तर त्या शस्त्राचा वापर करून ते स्वसंरक्षण करू शकतात, असे निर्देश चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी यंत्रणेला दिले. नागभीडचे प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे यांच्या अंत्यसंस्कारासमयी ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त निर्देशाची माहिती दिली. गुंंडांशी आता कठोरपणे वागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ते म्हणाले, चंद्रपूर जिल्हा शांत जिल्हा असल्याने नाकाबंदीच्या वेळी पोलीस शस्त्र सोबत बाळगत नव्हते. आता आम्ही निर्देश दिले आहेत की पोलिसांनी शस्त्र सोबत बाळगावे. जर कुणी अंगावर गाडी घालत असेल आणि त्यात जीव जाणार असेल तर स्वसंरक्षणार्थ गाडी चालवणा-यावर गोळ्या झाडण्याचे निर्देश दिले आहेत.चिडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारदारु तस्करांच्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना बुधवारी पोलीस मुख्यालयात शोकाकूल वातावरणात मानवंदना देण्यात आली. यावेळी बंदुकीतून तीन फैरी झाडण्यात आल्या. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि पोलीस दलातील वरिष्ठांनी चिडे यांना पुष्पांजली वाहून श्रद्धांजली अर्पण केली.या गुन्ह्याचा तपास युध्दपातळीवर सुरू आहे. लवकरच सर्व आरोपींना ताब्यात घेतले जाईल. पकडलेल्या पाच आरोपींकडून अधिक माहिती घेतली जात आहे.-प्रशांत परदेशी,उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र