शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

SIMI चे सदस्य असल्याचा २२ वर्षापासून आरोप, १२२ जणांची न्यायालयाकडून दोषमुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 17:46 IST

127 accused aquitted by Surat Court : या १२७ पैकी सात आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. पाच वगळता इतर सर्व जामिनावर सुटले आहेत.

ठळक मुद्देमुख्य न्यायदंडाधिकारी ए.एन. दवे यांनी संशयाचा फायदा घेत सिमीचे सदस्य म्हणून अटक केलेल्या १२२ लोकांना निर्दोष सोडले आहे.

गुजरातमधील सुरत येथील कोर्टाने यूएपीए अंतर्गत २० वर्षांच्या जुन्या प्रकरणातील १२७ लोकांना दोषमुक्त करण्यात आले आहे. डिसेंबर २००१ मध्ये "स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया" (सिमी) या बंदी घातलेल्या संघटनेच्या बैठकीला हजेरी लावल्याचा आरोप या लोकांवर होता.या १२७ पैकी सात आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. पाच वगळता इतर सर्व जामिनावर सुटले आहेत. हे पाच आरोपी सध्या स्वतंत्र प्रकरणात तुरूंगात आहेत. आपल्या आदेशात कोर्टाने म्हटले आहे की, सरकारी पक्ष “विश्वासार्ह आणि समाधानकारक” पुरावे सादर करण्यात अयशस्वी ठरला आहे आणि हे सिद्ध करणे शक्य नाही की, आरोपी सिमीचे सदस्य आहेत आणि बंदी घातलेल्या संघटनेच्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी जमले होते.द इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार न्यायालयाने असे मानले की, आरोपी शैक्षणिक कार्यक्रमासाठी जमले होते आणि त्यांच्याकडे कोणतीही शस्त्रे नव्हती. कोर्टाने म्हटले आहे की, आरोपींना यूएपीए अंतर्गत दोषी ठरवले जाऊ शकत नाही. सुरत कोर्टाने सांगितले की, आरोपींना युएपीए अंतर्गत दोषी ठरवले जाऊ शकत नाही. मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एन. दवे यांनी संशयाचा फायदा घेत सिमीचे सदस्य म्हणून अटक केलेल्या १२२ लोकांना निर्दोष सोडले आहे.कोर्ट ट्रायलदरम्यान १२७ पैकी ७ आरोपींचा मृत्यू झालासुरत पोलिसांनी युएमएच्या विविध कलमांतर्गत २८ डिसेंबर २००१ रोजी १२३ लोकांना अटक केली होती, कारण ते सिमीचे सदस्य होते आणि शहरातील नवसारी बाजारात संघटित समाज विघातक घटनांना प्रोत्साहन देण्यासाठी जमले होते. नंतर आणखी चार जणांना अटक करण्यात आली.सिमी संघटनेत सामील होण्यासाठी फॉर्म, ओसामा बिन लादेन याचे स्तुती करणारी पुस्तके आणि बॅनर यासारख्या वस्तू जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

आपल्या बचावासाठी आरोपी म्हणत होते की, तो सिमीचा नाही आणि सर्वजण "अखिल भारतीय अल्पसंख्याक शिक्षण मंडळाने" आयोजित केलेल्या परिसंवादात सहभागी होण्यासाठी आले होते. हे लोक गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधून आले होते.

टॅग्स :Courtन्यायालयSuratसूरतPoliceपोलिसjailतुरुंग