पोटात दुखू लागल्यानं १२ वर्षीय मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले; धक्कादायक प्रकार उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 19:54 IST2021-08-23T19:53:05+5:302021-08-23T19:54:19+5:30
मुलीच्या आई वडिलांनी तिच्या पोटात दुखत असल्याने बालेसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले.

पोटात दुखू लागल्यानं १२ वर्षीय मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले; धक्कादायक प्रकार उघडकीस
जोधपूर – राजस्थानात एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी १२ वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार केला. त्यानंतर जोधपूर हॉस्पिटलमध्ये या पीडित मुलीने एका मुलाला जन्म दिला आहे. रविवारी रात्री पीडितेच्या आईवडिलांनी मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याठिकाणी मुलीने एका नवजात बालकाला जन्म दिला. मुलगी आणि बालक दोघंही सुखरुप असल्याचं राजस्थान बालकल्याण समितीचे प्रमुख धनपत गुर्जर यांनी सांगितले.
धनपत गुर्जर म्हणाले की, मुलीच्या आई वडिलांनी तिच्या पोटात दुखत असल्याने बालेसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. तिथे हॉस्पिटलमध्ये मुलगी गर्भवती असल्याचं कळताच मुलीच्या आई वडिलांनी तिचा गर्भपात करा अशी मागणी केली. त्यानंतर स्थानिक रुग्णालयात हे प्रकरण पोहचले. जोधपूर हॉस्पिटलने याबाबत पोलिसांना माहिती दिली. तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.
मुलीने सांगितलेला घडलेला प्रकार
सीडब्ल्यूसीचे प्रमुख म्हणाले की, जोधपूर हॉस्पिटलमध्ये मुलीने पोलीस आणि डॉक्टरांना तिच्यासोबत घडलेल्या अतिप्रसंगाबद्दल माहिती दिली. सध्या या प्रकरणावर पोलिसांनी मौन बाळगलं आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दोन मुलांची पीडित मुलीने नावं घेतली त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात राजस्थान बालकल्याण अधिकार आयोगाने दखल घेतली असून पीडित मुलीला आणि तिच्या आईवडिलांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. आयोगाच्या अध्यक्षा संगीता बेनीवाल यांनी मुलगी आणि तिच्या आई वडिलांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.