ऑर्केस्ट्रा बारमधून ग्राहक आणि बारबालांसह १२ जणांना पकडले
By धीरज परब | Updated: February 16, 2023 10:03 IST2023-02-16T10:00:47+5:302023-02-16T10:03:38+5:30
या प्रकरणी १४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी बारचा मालक जगदीश कृष्ण शेट्टी व चालक सतीश महाबल शेट्टी सह १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ऑर्केस्ट्रा बारमधून ग्राहक आणि बारबालांसह १२ जणांना पकडले
मीरारोड - काशीमीरा पोलिसांनी महामार्गालगत असलेल्या के नाईट ऑर्केस्ट्रा बारमध्ये चालणाऱ्या अश्लील नाच प्रकरणी छापा टाकून ग्राहक आणि बारबालांसह १२ जणांना पकडले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिलेल्या माहिती नुसार, सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, उपनिरीक्षक अर्चना जाधव यांच्यासह सुदाम शेळके, राहुल सोनकांबळे, निलेश शिंदे, प्रवीण टोबरे यांच्या पथकास कारवाईचे निर्देश दिले होते. पथकातील साध्या वेशातील पोलीस हे पंचांसह बारमध्ये गेले असता तेथे ५ गायिका म्हणून काम करणाऱ्या बारबाला तंग व तोकड्या कपड्यात अश्लील अंगविक्षेप करत नाचताना दिसून आल्या.
पोलिसांनी बारमध्ये छापा टाकून त्या ५ बारबालांसह ३ ग्राहक व ४ बारचे कर्मचारी यांना पकडले. बार मधून १३ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी १४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी बारचा मालक जगदीश कृष्ण शेट्टी व चालक सतीश महाबल शेट्टी सह १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.