फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून 12 लाख रुपये लुटले, बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात होता कर्मचारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 14:41 IST2022-07-11T14:41:20+5:302022-07-11T14:41:54+5:30
12 Lakh Loot in Madhepura Bihar : फायनान्स कंपनीचा कर्मचारी बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात होता. याचदरम्यान ही घटना घडली.

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून 12 लाख रुपये लुटले, बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात होता कर्मचारी
मधेपुरा : बिहारमधील मधेपुरा येथे चोरट्यांनी भरदिवसा एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कर्मचाऱ्याकडून जवळपास 12 लाख रुपयांचा ऐवज लुटला आहे. बँक रोड येथील एसबीआयच्या 200 मीटर आधी ही घटना घडली.
फायनान्स कंपनीचा कर्मचारी बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात होता. याचदरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.यापूर्वी शहरातील एका प्रसिद्ध माजी मुख्याध्यापकाच्या घरावरील लाखोंच्या दरोड्याची उकलही पोलिसांना अद्याप करता आली नाही. तोपर्यंत आता पुन्हा एकदा दरोडेखोरांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. एसबीआय रोड हा शहरातील सर्वात वर्दळीचा परिसर आहे.
या घटनेनंतर फायनान्स कंपनीचा कर्मचारी घाबरून रडू लागला. काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता. मात्र, बॅगेत 10 ते 12 लाख रुपये असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, बँकिंग सुविधा पुरविणाऱ्या रेडियन कंपनीचे कर्मचारी चंदन कुमार हे चोला फायनान्स, महिंद्रा फायनान्स आणि अॅमेझॉनकडून सुमारे 12 लाख रुपये घेऊन सकाळी साडेदहाच्या सुमारास बँकेत जमा करण्यासाठी जात होते.
दरम्यान, एसबीआय रोड येथील राज हॉटेलसमोर होंडा शाईन दुचाकीवरील दोन चोरटे मागून आले आणि त्यांना पाठीमागून ढकलून दिले. यानंतर शस्त्राच्या जोरावर सर्व रक्कम हिसकावून ते फरार झाले.