निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 12 लाख 48 हजार रुपयांची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 17:04 IST2019-10-16T17:02:24+5:302019-10-16T17:04:19+5:30
महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 12 लाख 48 हजार रुपयांची रोकड जप्त
कल्याण - कल्याण पश्चिमचे निवडणूक निर्णय अधिकारी अजिंक्य पडवळ व अति. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुहास गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक प्रमुख दामोदर साळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कल्याण पश्चिम येथील सुभाष चौक येथे उल्हासनगरच्या दिशेकडून येणाऱ्या संशयीत चारचाकी वाहनांची तपासणी केली असता, सदर गाडीमध्ये वाहनचालक याच्यासमोर गाडी तपासली असता त्यामध्ये 12 लाख 48 हजार रुपयांची रोकड त्यांना सापडली. पथक प्रमुख साळवी यांनी रोकडबद्दल वाहन चालकाकडे विचारणा केली असता, सदर वाहन चालक कोणतीही माहिती देऊ न शकल्याने हस्तगत केलेली रक्कम महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे.
सदर रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे रोख रक्कम काढल्याचे व घेऊन जाण्याचे योग्य पुरावे दिल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या समितीसमोर याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. विधानसभा निवडणुकीत कल्याणमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड हस्तगत केल्याने, पथकाचे अभिनंदन करण्यात आले.