चार टोळ्य़ांच्या म्होरक्यांसह 11 जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 16:25 IST2018-11-28T16:24:49+5:302018-11-28T16:25:57+5:30
463 ग्रॅम सोन्यासह, 17 हजाराची रोकड,चार मोबाईल हस्तगत, १० गुन्ह्यांची उकल

चार टोळ्य़ांच्या म्होरक्यांसह 11 जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद
अलिबाग - जिल्हयात दिवसा व रात्री घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाल्याने गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांच्या नेतृत्वाखालील विशेष पोलीस तपास पथकाने केलेल्या कारवाईत घरफोडीचे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले असून एकूण चार टोळ्य़ांच्या म्होरक्यांसह 11 आरोपींना यांना अटक करण्यात आली आहे.
या आरोपींकडून 463 ग्रॅम सोन्याच दागिने, 17 हजार रुपयांची रोख रक्कम आणि चार मोबाईल असा एकूण 15 लाख रूपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.