बुराडी सारखीच घटना; एकाच घरात आढळले 11 जणांचे मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 17:43 IST2018-08-06T17:20:09+5:302018-08-06T17:43:25+5:30
राजधानी दिल्लीतील बुराडी भागात एकाच घरात 11 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ माजली होती. अशीच घटना मेक्सिकोत घडली आहे.

बुराडी सारखीच घटना; एकाच घरात आढळले 11 जणांचे मृतदेह
मेक्सिको : राजधानी दिल्लीतील बुराडी भागात एकाच घरात 11 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ माजली होती. अशीच घटना मेक्सिकोत घडली आहे. येथील उत्तरेकडील चिहुआहुआ भागातील सिउडाड जुआरेज येथील एका घरात 11 मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, 11 जणांना घरात बांधून ठेवले होते. त्यानंतर त्यांना ठार करण्यात आले.
आयएएनएस या वृत्तपत्राच्या माहितीनुसार, 11 मृतदेहांमध्ये 3 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. तसेच, या मृत व्यक्तींना ड्रग्ज देण्यात आल्याचे म्हटले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे. या 11 जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेबाबत जुआरेजचे मेयर अरमाडो कॅबेडा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्या घराच्या शेजारी असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या घरात कोणाही राहत नव्हते. मात्र, सतत त्याठिकाणी पार्ट्या होत होत्या. त्यावेळी अनेक लोक येत-जात होते, असे अरमाडो कॅबेडा म्हणाले. दरम्यान, सर्व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.