सराफासह ११ जणांची दोन कोटींना फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:38 IST2018-08-03T00:38:14+5:302018-08-03T00:38:22+5:30

दादरचे नामांकित सराफा सुधीर श्यामराव पेडणेकर (६५) यांच्यासह ११ जणांना स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली २ कोटी ३९ लाख ६२ हजारांची फसवणूक केली. पेडणेकर यांच्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलिसांनी बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

 11 crores fraud with gold, two crores fraud | सराफासह ११ जणांची दोन कोटींना फसवणूक

सराफासह ११ जणांची दोन कोटींना फसवणूक

मुंबई : दादरचे नामांकित सराफा सुधीर श्यामराव पेडणेकर (६५) यांच्यासह ११ जणांना स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली २ कोटी ३९ लाख ६२ हजारांची फसवणूक केली. पेडणेकर यांच्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलिसांनी बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
दादर परिसरात पेडणेकर हे कुटुंबीयांसह राहातात. आरोपींनी २००७मध्ये पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला. याच परिसरातील नावलकर इमारतीच्या पुनर्विकासात तेथे स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष त्यांना दाखविले. त्यानुसार, पेडणेकर यांच्यासह ११ जणांनी घरासाठी गुंतवणूक केली. २२ जुलै २००७ ते २८ आॅगस्ट २०१४ यादरम्यान त्यांनी तब्बल २ कोटी ३९ लाख ६२ हजार घरासाठी दिले. मात्र पैसे देऊनही ना बांधकाम उभे राहिले, ना फ्लॅट मिळाला.
पेडणेकर यांनी आरोपींकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांच्यासह ११ जणांनी बुधवारी पोलिसांत धाव घेतली.

Web Title:  11 crores fraud with gold, two crores fraud

टॅग्स :Crimeगुन्हा