शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १0 वर्षे तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 18:58 IST

क्रिकेट खेळत असताना वरच्या मजल्यावर बॉल आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता.

पुणे : क्रिकेट खेळत असताना वरच्या मजल्यावर बॉल आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-याला न्यायालयाने १० वर्ष सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा निकाल दिला. किशोर रामप्रित चौहान याला शिक्षा दिली. अत्याचार झालेल्या ९ वर्षांच्या पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. २३ ऑगस्ट २०१५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास धानोरीतील एका इमारतीमध्ये हा प्रकार घडला होता. घटनेच्या दिवशी संबंधित मुलगी ही त्यांच्या मोठ्या भावाबरोबर क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळताना बॉल वरच्या मजल्यावर गेला होता. तो आणण्यासाठी पीडित मुलगी वरती गेली. त्यावेळी चौहान याने तिच्यावर अत्याचार केला. बराच वेळ झाल्यानंतरही बहीण खाली न आल्याने तिचा भाऊ वरती गेला. त्यावेळ त्याने हा प्रकार पाहिला. त्याबाबत आई-वडिलांना माहिती दिल्यानंतर चौहानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिले. त्यांनी एकूण १० साक्षीदार तपासले. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सीता लोमटे यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. दंडाच्या रक्कमेपैकी ५ हजार रुपये पीडित मुलीला देण्यात यावे, असे आदेशात नमूद आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjailतुरुंगRapeबलात्कार