मीरारोड येथील ऑर्केस्ट्रा बारवरील धाडीत १० जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 20:49 IST2023-01-11T20:47:38+5:302023-01-11T20:49:27+5:30
मीरारोड - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेने मीरारोडच्या सिल्व्हर पार्क परिसरात असलेल्या एंजल पॅलेस उर्फ खुशी या ऑर्केस्ट्रा बारमध्ये ...

मीरारोड येथील ऑर्केस्ट्रा बारवरील धाडीत १० जण ताब्यात
मीरारोड - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेने मीरारोडच्या सिल्व्हर पार्क परिसरात असलेल्या एंजल पॅलेस उर्फ खुशी या ऑर्केस्ट्रा बारमध्ये बारबाला अश्लील नाच करत असल्याप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.
चंद्रेश ऍकॉर्ड इमारतीत असलेल्या हा ऑर्केस्ट्रा बारमध्ये गायिकांच्या आड तरुणींकडून नृत्य करवून घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांनी बोगस ग्राहक पाठवून खात्री केली. त्यात तथ्य आढळताच पोलीस पथकाने मध्यरात्री बारवर धाड टाकली असता बारबाला अश्लील नृत्य करीत असल्याचे दिसून आले.
बारचे मालक व चालक, व्यवस्थापक, रोखपाल, वेटर, पुरुष गायक - वादक हे तरुणींना अश्लील नृत्य करण्यास भाग पाडत असल्याने १० जणांना ताब्यात घेत बारमधील ३७ हजार २०० रुपये रोख आदी जप्त केली. १० जणांविरोधात मीरारोड पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.