उभ्या असलेल्या ट्रक मधून १० लाखाचे भंगार लांबवले; चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 23:14 IST2021-12-01T23:12:35+5:302021-12-01T23:14:24+5:30
Crime News : ओडीशा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतून अल्युमिनियम तार व इतर भंगार असे एकूण २६० बॉक्स ट्रकने (एमएच ०६ एसी ५९५१) अंबरनाथ येथे नेले जात होते.

उभ्या असलेल्या ट्रक मधून १० लाखाचे भंगार लांबवले; चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील प्रकार
चाळीसगाव जि. जळगाव : उभ्या असलेल्या ट्रकमधून दहा लाख ४० हजार रुपये किंमतीचे आर्डनन्स फॅक्टरीतील अल्युमिनियमचे भंगार चोरीस गेले. ही घटना मंगळवारी रात्री चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोर घडली.
ओडीशा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतून अल्युमिनियम तार व इतर भंगार असे एकूण २६० बॉक्स ट्रकने (एमएच ०६ एसी ५९५१) अंबरनाथ येथे नेले जात होते. मंगळवारी रोजी रात्री १२.३० ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान हा ट्रक चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील नक्षत्र पेट्रोल पंपासमोर उभा होता. त्याचवेळी या ट्रकच्या पाठीमागील प्लॅस्टिकची ताडपत्री व दोर कापून चोरट्यांनी वरील साहित्य चोरून नेले.
ट्रकचालक प्रकाश उर्फ हिरामण देवचंद भोई (रा. पाडळसे ता.यावल जि. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय भालचंद्र पाटील करीत आहे.