शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर १० किलो अंमली पदार्थांची पाकिटे जप्त

By निखिल म्हात्रे | Updated: August 27, 2023 22:53 IST

जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समुद्र किनाऱ्यासह महत्वाचे ठिकाणी गस्त घालण्यात येत होती.

अलिबाग - श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास १०किलो ५५८ ग्रॅम वजनाची अंमली पदार्थाची पाकिटे मिळून आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी अंमली पदार्थाची पाकिटे मिळून आली होती. त्यानंतर रायगड पोलिस सतर्क झाले होते.

जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समुद्र किनाऱ्यासह महत्वाचे ठिकाणी गस्त घालण्यात येत होती. तसेच या शोध मोहिमेबाबत सर्व सागरी पोलीस ठाणे हद्दीतील मच्छीमार सोसायट्या आणि सागरी सुरक्षा रक्षकांना सतर्क करण्यात आले होते. रविवारी शोध मोहीम सुरू असताना संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास श्रीवर्धन बीच येथे अफघान प्रोडक्ट नाव असलेली नऊ अंमली पदार्थांची पाकिटे सापडली. यासर्व पाकिटांचे वजन १०किलो ५५८ ग्रॅम आहे. या सर्व घटनेचा तालुका दंडाधिकारी यांचे समक्ष पंचनामा करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट कलम ८(व), २० (5) (२) (ब), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकारची आणखी पाकिटे मिळण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांना अशा संशयास्पद वस्तू आढळून आल्यास नजिकच्या पोलीस ठाण्यात माहिती यावी. नागरिकांना अंमली पदार्थाची पाकिटे मिळाल्यास स्वतःच्या फायद्याकरिता लपवून ठेवल्यास त्यांचेवर गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात येईल.- सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड.

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगडPoliceपोलिस