लग्नानंतर १० दिवसात विवाहितेने दिला बाळाला जन्म; सत्य उघड होताच कुटुंबाला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 11:12 IST2023-06-07T11:12:08+5:302023-06-07T11:12:52+5:30

हे प्रकरण कानपूरच्या देहात येथील आहे. याठिकाणी गावात राहणाऱ्या युवतीचे १५ मे २०२३ रोजी भोगनीपूर येथील एका गावात लग्न झाले.

10 days after the marriage, the married woman gave birth to a baby; The family is shocked when the truth is revealed | लग्नानंतर १० दिवसात विवाहितेने दिला बाळाला जन्म; सत्य उघड होताच कुटुंबाला धक्का

लग्नानंतर १० दिवसात विवाहितेने दिला बाळाला जन्म; सत्य उघड होताच कुटुंबाला धक्का

कानपूर - उत्तर प्रदेशच्या कानपूर देहात इथं हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी लग्नाच्या अवघ्या १० दिवसांनीच नवविवाहितेने मुलाला जन्म दिला. त्यानंतर पती आणि सासरच्यांनी तिला स्वीकारण्यास नकार दिला. तर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलीस शोध घेत आहेत. 

हे प्रकरण कानपूरच्या देहात येथील आहे. याठिकाणी गावात राहणाऱ्या युवतीचे १५ मे २०२३ रोजी भोगनीपूर येथील एका गावात लग्न झाले. लग्नानंतर पाचव्या दिवशी जेव्हा माहेरी आली तेव्हा २५ मे रोजी तिच्या पोटात अचानक दुखू लागले. नातेवाईकांनी तात्काळ तिला अकबरपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. ज्याठिकाणी प्रसुती वेदनेमुळे २६ मे रोजी एका मुलीला जन्म दिला. मात्र नवजात बालकाची प्रकृती कमकुवत असल्याने अवघ्या काही तासांत तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची पती आणि सासरच्यांना माहिती मिळताच त्यांनी पत्नीला स्वीकारण्यास नकार दिला. 

त्यानंतर ६ जून रोजी पीडिता आणि तिच्या कुटुंबाने पोलीस स्टेशनला धाव घेत गावातीलच अरुण पाल आणि विनय पाल यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. अरुण आणि विनय यांनी अनेकदा पीडितेचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर या प्रकाराची कुठेही वाच्यता केली तर तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. बहादुर सिंह यांनी सांगितले की, अरुण पाल आणि विनय पाल यांच्याविरोधात ३७४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला मेडिकलसाठी पाठवले असून सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 

Web Title: 10 days after the marriage, the married woman gave birth to a baby; The family is shocked when the truth is revealed