व्यक्तीमत्त्व जडणघडणीत रासेयोची भूमिका महत्त्वाची
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:12+5:302015-02-18T00:13:12+5:30
नांदेड: विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्त्व घडवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत प्राचार्य डॉ़ एऩव्ही़ कल्याणकर यांनी व्यक्त केले़

व्यक्तीमत्त्व जडणघडणीत रासेयोची भूमिका महत्त्वाची
न ंदेड: विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्त्व घडवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत प्राचार्य डॉ़ एऩव्ही़ कल्याणकर यांनी व्यक्त केले़ यशवंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोमेश्वर येथे पर्यावरण व नैसर्गिक साधन संपत्तीच्या संवर्धनासाठी सात दिवशीय शिबीर घेण्यात आले़ उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ़ कल्याणकर तर प्रमुख पाहुणे म्हूणन नरेंद्र चव्हाण, उपप्राचार्य प्रा़ डी़पी़ माने, प्रा़ एस़बी़ चव्हाण, संदीप पाटील, सरपंच मथूराबाई बोकारे, बाबूराव बोकारे, आनंदा बोकारे, विद्यार्थी सचिव साईप्रसाद ढवळे, विक्रम बोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती़ सूत्रसंचलन जिल्हा समन्वयक डॉ़ शिवराज बोकडे तर मधूकर वाघ यांनी आभार मानले़ यशस्वीतेसाठी डॉ़ संगीता पुगे, डॉ़ अशोक हेंबाडे, अनिकेत कोकरे आदींनी परिश्रम घेतले़