शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांची तयारी पूर्ण पहिल्या टप्प्यातील परीक्षा ११ मे रोजी होणार

By admin | Updated: May 9, 2014 19:26 IST

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी दि. ११ मे रोजी होणार्‍या पहिल्या टप्प्यातील प्रवेश परीक्षांची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी आज (शुक्रवारी) येथे दिली. प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ. एम. बी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे यांच्या उपस्थितीत या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी दि. ११ मे रोजी होणार्‍या पहिल्या टप्प्यातील प्रवेश परीक्षांची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी आज (शुक्रवारी) येथे दिली. प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ. एम. बी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे यांच्या उपस्थितीत या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
एम.ए., एम.ए. (मास. कॉम.), बीजेसी, एमजेसी, एमबीए, एमबीए (एक्झिक्युटीव्ह) या अभ्यासक्रमांसाठी ऑफलाइन तर एम.एस्सी. (प्राणीशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र, ग्रोकेमिकल व पेस्ट मॅनेजमेंट, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा होणार आहे. पदव्युत्तर प्रवेश, परीक्षा विभाग व संगणक विभाग या तीन विभागांच्या समन्वयातून प्रवेश परीक्षांची तयारी केली. यासाठी सर्व संबंधितांना आढावा बैठकीत योग्य निर्देश देण्यात आल्याचे डॉ. हिर्डेकर यांनी सांगितले. सर्व परीक्षा सुरळीत होण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर स्थानिक अंतर्गत व बा‘ परीक्षकांसह विद्यापीठाचा एक प्रतिनिधी पूर्णवेळ उपस्थित असणार आहे. एखाद्या पात्र विद्यार्थ्याचे नाव यादीत नसेल आणि त्याच्याकडे शुल्क भरल्याची पावती असेल, तर ओळखपत्र पाहून आणि विहीत नमुन्यातील अर्ज भरून घेऊन त्यालाही परीक्षा देण्यास परवानगी देण्यात येईल. ऑनलाइन या परीक्षा इंटरनेट वेग आणि वीजपुरवठा या तांत्रिक बाबींवर अवलंबून असल्याने ऐनवेळी काही अडचण उद्भवल्यास सदर परीक्षांसाठी प्रश्नपत्रिकांच्या हार्ड कॉपी व ओएमआर उत्तरपत्रिकांचीही उपलब्धता संबंधित परीक्षा केंद्रांवर असणार आहे. प्रवेश परीक्षेच्या वेळापत्रकाच्या अधिकृत माहितीसाठी परीक्षार्थींनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रक, त्यांच्याकडील हॉल तिकीट आणि त्यांना परीक्षा विभागाकडून आलेले लेटेस्ट एसएमएस यानुसारच परीक्षा केंद्रांवर परीक्षेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. हिर्डेकर यांनी केले. (प्रतिनिधी)
....................................................................................
अशी आहेत परीक्षा केंद्रे...
शिवाजी विद्यापीठातील मानव्यविद्या इमारत व भूगोल अधिविभाग, विवेकानंद महाविद्यालय, सांगली : मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय व कस्तुरबाई वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय. सातारा : यशवंतराव चव्हाण इन्स्टट्यिूट या परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार आहेत. कोल्हापूर इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली : राजारामबापू इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी, साखराळे.सातारा : दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बाणवडी, कराड या केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येतील.
.....................................................................................