देश-परदेश : बर्निंग ट्रेनमुळे अमेरिकेत दोन गावे केली रिकामी
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:23+5:302015-02-18T00:13:23+5:30
बर्निंग ट्रेनमुळे अमेरिकेत

देश-परदेश : बर्निंग ट्रेनमुळे अमेरिकेत दोन गावे केली रिकामी
ब ्निंग ट्रेनमुळे अमेरिकेत दोन गावे केली रिकामीवॉशिंग्टन : कच्चे तेल घेऊन जाणारी मालवाहू रेल्वे घसरून आग लागल्यामुळे व्हर्जिनियातील दोन गावे रिकामी करण्यात आली. अंशत: गोठलेल्या नदीजवळून आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट उठत असल्याची छायाचित्रे स्थानिक संकेतस्थळांनी प्रकाशित केली आहेत. मालगाडीच्या १४ वाघिन्यांची हानी झाली असून एक कानाव्हा नदीत कोसळल्याचे अधिकार्यांनी सांगितले. या दुर्घटनेत एका व्यक्तीला धुराचा त्रास झाला. याशिवाय अन्य कोणाला काहीही इजा झालेली नाही. अपघात झाल्यानंतर अदेना व बूमर गावातील नागरिकांना गावे रिकामी करण्याचे आवाहन करण्यात आले. तेलाला लागलेली आग अद्यापही नियंत्रणाबाहेर असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. नदीत पडलेल्या वाघिनीतून तेलाची गळती होत आहे, असे राज्याच्या सैन्य व्यवहार व सार्वजनिक सुरक्षा विभागाच्या लॉरेन्स मिस्सीना यांनी सांगितले. व्हर्जिनियाच्या आपत्कालीन, तसेच पर्यावरण विभागाच्या अधिकारी मोन्टगोमेरी भागातील दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. रेल्वे रुळावरून घसरल्यानंतर दुर्घटनास्थळापासून तीन मैलावर असलेला जलप्रक्रिया प्रकल्प बंद करण्यात आला आहे. या प्रकल्पातून तीन हजार घरांना पाणीपुरवठा होतो. व्हर्जिनियात सध्या हिमवृष्टी सुरू आहे. काही ठिकाणी तर पाच इंचापर्यंत बर्फ पडला आहे. हिमवृष्टीमुळेच ही दुर्घटना घडली किंवा काय हे लगेचच समजू शकले नाही.