शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

भन्नाट दोस्तांचा कॅम्पस कट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 5:08 PM

सगळे वेगवेगळे पण दोस्तीनं मात्र त्यांना एकत्र आणलं.

ठळक मुद्देकॉलेजचं शेवटचं वर्षे, यापुढे सोबत असतील फक्त आठवणी

नुपूर जालेवार

आमचा कट्टा सगळ्यात आगळावेगळा आहे. तसा तो प्रत्येकालाच वाटतो आपापला. तसा तो आम्हाला पण वाटतो. कोणतीच गोष्ट सारखी नाही आमच्यात. कोणी अभ्यासात हुशार आहे , आपल्या  डिपार्टमेण्टमध्ये टॉपर आहे. कुणी जेमतेम. कुणी जाड, तर कुणाला मेकअपवरुन चिडवलं जातं. कोणी खुपच शांत म्हणून त्याला सायलेण्ट मोड  म्हणतो तर कोणाची इतकी बडबड कि तोंडाला चिकटपट्टी लावता आली असती तर बर झालं असतं असं वाटतं.कॉलेजच्या सगळ्या पार्टी  करण्यात आम्ही सगळे एकत्न असतो . अन्युअल फंक्शन ची धम्माल तर वेगळीच. तसंच आम्ही विविध  उपक्र मात पण सहभागी होतो. दौलताबादला कॉलेजतर्फे वृक्षारोपण केला आहे तिथे झाडांना पाणी देण्याचा उपक्रम मस्त झाला होता.  पहिल्यांदा सगळे फिरायला लेणीला गेलो होतो तेव्हा खूप मोठं भांडण झालं होतं वाटलं कि संपला ग्रुप पण परत दुसर्‍या दिवशी कॅम्पस मध्ये भेटलो तर सगळं पहिल्यासारखं होतं. कोणी जर कधी रडत असेल तर हसवणारे आम्ही कधी कधी सगळे एकासाठी रडत असतो.  दुसर्‍यांदा  आम्ही फिरायला गेलो तेव्हा आमच्यातल्या तिघींचा अपघात  झाला. त्यात मी ही होते. ज्याप्रकारे सगळ्यांनी सांभाळून घेतल्ं  त्याने तर आमची मैत्नी अजूनच घट्ट झाली .खरंतर कॅम्पसनेच आमचा ग्रुप तयार केला कारण सुरु वातीला सगळे दूर होते. आम्ही कोणी एका वर्गातले नाही . सगळ्यांचे विषय वेगळे आहेत . तरी पण आम्ही एकत्र  आलो .एखाद्या लेर नंतर रिकामा क्लासरूम शोधून तिथे गप्पा मारत बसणं नाहीतर गेम खेळणं.  कॉलेज कॅन्टीन मध्ये घरचे डबे भांडून खाण्याची मजाच भारी.  दुसरी कोणती वाईट सवय नसली तरी चहाची आहे हे तर कॅन्टीनच्या मावशीना पण चांगलं समजलं आहे . कोणाला पण सरळ नावाने हाक मारतच नाही त्यात गावरान तडका असतो आपुलकीचा. कोण काय विचार करतो आमच्याबद्दल त्याने आम्हाला फरक पडत नाही. आता हे आमच शेवटचं वर्ष आहे . म्हणून एकेक दिवस भरभरुन जगत आठवणी जमा करतो आहोत.