शिष्यवृत्ती निकाल ३१ मे रोजी जिल्ातील ५६ हजार विद्यार्थ्यांच्या निकालाकडे नजरा (जिल्हा परिषद लोगो)
By admin | Updated: May 9, 2014 21:13 IST
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ३१ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ातून ५६ हजार ७१४ विद्यार्थी बसले होते. दोन दिवसांत परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर अंतिम उत्तर सूची टाकली जाणार आहे.
शिष्यवृत्ती निकाल ३१ मे रोजी जिल्ातील ५६ हजार विद्यार्थ्यांच्या निकालाकडे नजरा (जिल्हा परिषद लोगो)
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ३१ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ातून ५६ हजार ७१४ विद्यार्थी बसले होते. दोन दिवसांत परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर अंतिम उत्तर सूची टाकली जाणार आहे. गेल्यावर्षीपर्यंत इयत्ता चौथी व इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम व शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास वेगवेगळे होते. यावर्षीपासून दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम एकच आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाल्याशिवाय परीक्षा घेता आल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी २३ मार्च २०१४ ला परीक्षा झाली. प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात निकाल लावला जात होता पण यावर्षी परीक्षा उशिरा झाल्याच त्याबरोबर लोकसभा निवडणुकीमुळे निकाल लांबणीवर पडला आहे. दोन दिवसांत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर अंतिम उत्तर सूची टाकली जाणार आहे. त्यानंतर ३१ मेरोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. तालुकानिहाय शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेले विद्यार्थी -तालुका पूर्वमाध्यमिक माध्यमिक एकूणआजरा १२८३ ११२६ २४०९गगनबावडा ५६७ ४१४ ९८१भुदरगड १६३२ १३३९ २९७१चंदगड १८९१ १६१६ ३५०२गडहिंग्लज २६०० १८७१ ४४७१हातकणंगले ४००२ २६०८ ६६१०कागल २०७३ १६५८ ३७३१करवीर ३२३१ २४९१ ५७२२पन्हाळा २६६९ २२११ ४८८०राधानगरी २५७३ १९८३ ४५५६शाहूवाडी २६८८ १८९२ ४५८०शिरोळ २७७० १८६७ ४६३७कोल्हापूर मनपा २९४० २३८८ ५३२८इचलकरंजी नपा १२५८ १०७८ २३३६------------------------------------------------------------एकूण ३२१७७ २४५३७ ५६७१४-----------------------------------------------------------