रायपूर येथे उभारण्यात येणार राष्ट्रीय तिरंदाजी अकादमी CM विष्णुदेव साय म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:24 IST2025-06-06T15:20:49+5:302025-06-06T15:24:42+5:30

. या क्रीडा अकादमीसाठी जवळपास ३९.२२ कोटी एवढा खर्च करण्यात येणार आहे.

Cm Vishnu Dev Sai On National Archery Academy Will Be Built In Nava Raipur Players Will Get International Platform | रायपूर येथे उभारण्यात येणार राष्ट्रीय तिरंदाजी अकादमी CM विष्णुदेव साय म्हणाले...

रायपूर येथे उभारण्यात येणार राष्ट्रीय तिरंदाजी अकादमी CM विष्णुदेव साय म्हणाले...

रायपूर :  छत्तीसगडमधील युवा खेळाडूंच्या क्रीडा क्षेत्रातील उज्वल भविष्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी नवे रायपूर येथे राष्ट्रीय तिरंदाजी उभारण्याचा संकल्प केला आहे. ४ जूनला विष्णुदेव साय यांच्या अध्यक्षतेखाली महानदी भवन, नवे रायपूर येथे पार पडलेल्या मंत्रीपरिषदेच्या बैठकीत यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवे रायपूर येथील अटल नगर येथे राष्ट्रीय दर्जाची तिरंदाजी अकादमी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आलीये. ही अकादमी  देशातील धनुर्विद्येच सर्वोत्तम मंदिर करण्याच्या उद्देशाने या अकादमीमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल. सर्व सोयीसंह खेळाडूंच्या राहण्याची सुविधाही या अकादमीत असेल. या क्रीडा अकादमीसाठी जवळपास ३९.२२ कोटी एवढा खर्च करण्यात येणार आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री विष्णुदेव साय?

मुख्यमंत्री श्री विष्णुदेव साय यांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे  सांगताना म्हटले आहे की, फक्त एक वास्तू किंवा संस्था नसून छत्तीसगडमधील युवांसाठी ही सुवर्ण संधी असेल. आपल्याकडे प्रतिभावंता खेळाडूंची कमी नाही. फक्त योग्य प्रशिक्षण आणि संधी देण्याची गरज आहे.  राष्ट्रीय तिरंदाजी अकादमी राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा आणि प्रशिक्षण देण्यास सक्षम असेल. या अकादमीच्या माध्यमातून राज्याची क्रीडा क्षेत्रात एक नवीन ओळख निर्माण होईल आणि इथं प्रशिक्षण घेणारे खेळाडू देशासाठी अभिमानास्पद कामगिरीही करून दाखवतील. असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात उभारण्यात येणारी ही पहिली अकादमी

ही तिरंदाजी अकादमीच्या एनटीपीसी लिमिटेड मदतीने उभारण्यात येणार आहे. प्रस्तावित अकादमीत आउटडोअर तिरंदाजी रेंज, एसी युक्त इनडोअर रेंज, खेळाडूंसाठी निवासाची सोय आणि स्टाफ सदस्यांसाठी स्वसंत्र निवास व्यवस्था यासारख्या सुविधेसह ही अकादमी साकार करण्यात येईल. काम हाती घेतल्यावर वर्षभराच्या आत कामाला सुरुवात करत तीन वर्षांत ही सुसज्ज अकादमी उभारण्यात येणार आहेय  छत्तीसगडमध्ये पहिल्यांदाच तिरंदाजी सारख्या पारंपारिक क्रीडा अकादमीची उभारणी होणार आहे. 

Web Title: Cm Vishnu Dev Sai On National Archery Academy Will Be Built In Nava Raipur Players Will Get International Platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.