झीरो पेन्डसीसाठी जि.प.त प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:30 IST2017-09-28T00:30:28+5:302017-09-28T00:30:28+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने झीरो पेन्डसीसाठी सहा गठ्ठे पद्धतीचा अवलंब करण्यासाठी सर्व विभागांत पाहणी करून अवांतर संचिकांसह कालबाह्य कागदपत्रे निकामी करण्यास सांगण्यात आले. तर उद्या २८ रोजी जि.प.त कार्यशाळा होणार असून यास सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांची उपस्थिती राहणार आहे.

झीरो पेन्डसीसाठी जि.प.त प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या वतीने झीरो पेन्डसीसाठी सहा गठ्ठे पद्धतीचा अवलंब करण्यासाठी सर्व विभागांत पाहणी करून अवांतर संचिकांसह कालबाह्य कागदपत्रे निकामी करण्यास सांगण्यात आले. तर उद्या २८ रोजी जि.प.त कार्यशाळा होणार असून यास सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांची उपस्थिती राहणार आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेचे वय अवघे १९ वर्षांचे आहे. तरीही विविध विभागांत हजारो संचिका पडून आहेत. अनेक संचिकांची मुदत संपली असली तरीही त्या वेळेत रद्दीत काढल्या नसल्याने अजूनही सांभाळाव्या लागत आहेत. याशिवाय वापरामुळे खराब झालेल्या साहित्याचीही हीच बोंब आहे. विविध विभागात मोडके रॅक, कपाट, खुर्च्या, विद्युतीकरणाचे खराब झालेले साहित्य पडून असते. राज्यातील सर्वच जि.प.चा विचार केला तर काय परिस्थिती असेल, हे न सांगितलेलेच बरे. मात्र यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. कार्यालयाची जागा या अडगळीच्या साहित्यात व्यापून जाते. शिवाय या संचिका सांभाळाव्या लागतात. त्यामुळे त्यात कामाच्या, बिनकामाच्या, प्राधान्याच्या असे विभाजन करणे शक्य होत नाही. त्यामुळे विविध कामे करण्यात आपोआपच विलंब होतो. तर अनेक ठिकाणी या संचिकांमुळे महत्त्वाच्या संचिकांचीही आबाळ होताना दिसते. त्यामुळे शासनाने सहा गठ्ठे पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शासनाने नुकतीच कार्यशाळा घेतली. त्यानुषंगाने हिंगोली जिल्हा परिषदेत कामालाही प्रारंभ झाला. अति.मुकाअ मुकीम देशमुख, उपमुकाअ नीलेश घुले यांनी पाहणी केली.