जि.प. शिक्षकांची समायोजन प्रक्रिया रखडली
By Admin | Updated: June 24, 2014 00:13 IST2014-06-24T00:13:51+5:302014-06-24T00:13:51+5:30
जालना : जिल्हा परिषदेतील शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया झाली, मात्र समायोजन प्रक्रिया रखडली आहे.

जि.प. शिक्षकांची समायोजन प्रक्रिया रखडली
जालना : जिल्हा परिषदेतील शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया झाली, मात्र समायोजन प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे कोणत्या शाळेवर किती शिक्षक कार्यरत राहणार, हे अद्यापही निश्चित झालेले नाही.
जिल्हा परिषदेत सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. सुमारे सहा हजारांवर शिक्षक जिल्ह्यात कार्यरत आहेत. यात प्राथमिक शिक्षकांमधून मुख्याध्यापक पदी २३३ शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली.
तर ९५० शिक्षकांना उच्च प्राथमिक शिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात येत आहे. परंतु शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार तेथे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची संख्या निश्चित केली जाते.
परंतु यावर्षी शिक्षकांच्या समायोजनाअगोदर पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र सद्यस्थितीत प्रत्येक शाळेवर किती शिक्षक कार्यरत आहेत, हे निश्चित झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया लवकर राबविणे गरजेचे असल्याचे मत शिक्षकांमधूनच व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)