शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. कर्मचाऱ्याला पोलिसी गणवेश!

By admin | Updated: October 26, 2015 00:05 IST

बीड : स्वच्छ भारत जनजागृृती मोहिमेदरम्यान जि.प. मधील कर्मचाऱ्याला पोलिस कर्मचाऱ्याच्या वेशभूषेत दिमतीला ठेवल्याने सीईओ नामदेव ननावरे रविवारी वादाच्या भोवऱ्यात सापडले.

बीड : स्वच्छ भारत जनजागृृती मोहिमेदरम्यान जि.प. मधील कर्मचाऱ्याला पोलिस कर्मचाऱ्याच्या वेशभूषेत दिमतीला ठेवल्याने सीईओ नामदेव ननावरे रविवारी वादाच्या भोवऱ्यात सापडले.२२ ते २५ आॅक्टोबर दरम्यान सलग सुट्ट्या होत्या. या सुट्टीत सीईओ नामदेव ननावरे यांनी मुक्कामी दौरा काढून स्वच्छेतबाबत जनजागृती केली. चार दिवसांत ४० हून अधिक गावे त्यांनी पिंजून काढली;परंतु आष्टी तालुक्यातील दौऱ्यात जि.प. कर्मचाऱ्यालाच खाकी वर्दी चढविल्याचा प्रकार समोर आल्याने मोहिमेला गालबोट लागले. सीईओंसोबत ‘गूड मॉर्निंग-गूड इव्हिनींग’ पथक होते. पहाटे गावात जाऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना हे पथक नमस्कार करत होते. त्यानंतर गावकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना स्वच्छतेचे महत्त्व विषद करण्यात येत होते. या पथकात जि.प. कर्मचाऱ्याला पोलिसांच्या वेशभूषेत समाविष्ट केल्याचे छायाचित्रेही सोशल मीडियावर व्हायरल झाली. महाराष्ट्र पोलिसाचा बिल्ला, खांद्यावर पिवळ्या रंगाची शिट्टी जोडलेली दोरी तर कंबरेला काळ्या रंगाचा पट्टा या छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे. तथापि, सीईओंनी अधीक्षकांमार्फत पोलीस कर्मचारी मदतीला घेण्याऐवजी जि.प. कर्मचाऱ्याला पोलिसी वेशभूषा करण्याचे फर्मान सोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)