तरुणाचे अपहरण, पाच आरोपींना जामीन
By Admin | Updated: June 29, 2014 01:07 IST2014-06-29T00:52:22+5:302014-06-29T01:07:50+5:30
औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला सातारा परिसरातील बंगल्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना शनिवारी न्यायालयाने जामिनावर मुक्त केले.

तरुणाचे अपहरण, पाच आरोपींना जामीन
औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला सातारा परिसरातील बंगल्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना शनिवारी न्यायालयाने जामिनावर मुक्त केले.
सागर महादेव कदम याचे शुक्रवारी निराला बाजार येथून दुपारी पाच जणांनी अपहरण केले होते. आरोपींनी त्याला बळजबरीने कारमध्ये बसवून सातारा परिसरातील सूर्या लॉन्सच्या मागे असलेल्या बंगल्यात आणले. तेथे आणखी एका कारमधून काही तरुण आले आणि त्यांनी त्याला मारहाण केली. या घटनेनंतर ते त्याला सातारा पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अमित गिरधर मिसाळ (२०, रा. पृथ्वीनगर, सातारा परिसर), नईम पटेल अय्युब पटेल (२२, रा. ऊर्जानगर, सातारा परिसर) आणि विशाल रामदास गायके (२०, रा. गजानननगर, गारखेडा परिसर), अशोक परदेशी आणि अन्य एका महिलेला रात्री उशिरा अटक केली होती. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येऊन पोलिसांनी त्यांना पोलीस कोठडी मागितली.
यावेळी उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. यानंतर सर्व आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने सर्वांना जामीन मंजूर केल्याचे पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले.