शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

समलैंगिक डेटिंग ॲपवरून भेटण्यासाठी बाेलावून तरुणांची लुट; बी.एस्सी, नर्सिंगचे विद्यार्थी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 12:04 IST

सुशिक्षित तरुणांची टोळी; गेल्या नऊ महिन्यांत या टोळीने १० पेक्षा अधिक तरुणांना लुटले असल्याची माहिती

छत्रपती संभाजीनगर : समलैंगिकांच्या डेटिंग ॲपवर बनावट प्रोफाइल तयार करून शहरात तरुणांना लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे. गेल्या नऊ महिन्यांत या टोळीने १० पेक्षा अधिक तरुणांना लुटले. दौलताबादच्या एका तरुणाने पोलिसांकडे तक्रार करण्याची हिंमत केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. यात दौलताबाद पोलिसांनी शोध घेत वडगाव कोल्हाटी परिसरातून तिघांना अटक केली.

२५ वर्षीय तरुण राकेशचे (नाव बदलले आहे) दौलताबादमध्ये हॉटेल आहे. १६ मे रोजी फेसबुकवर त्याला समलैंगिकांचे 'वॉल ॲपची' (Wall App) जाहिरात दिसली. ते ॲप इंस्टॉल केल्यावर त्याला एका प्रोफाइलधारकाचा मेसेज आला. त्याने शहरातलाच असल्याचे सांगितल्यावर त्यांनी दुपारी भेटण्याचे ठरवले. दुपारी २ वाजता तीसगाव फाट्यावर दोघे भेटले. तेथून त्याने राकेशला करोडी टोलनाका परिसरात नेले. काही वेळात त्याचे दोन साथीदार तेथे गेले व त्यांनी राकेशला मारहाण सुरू केली. मोबाइलमध्ये चित्रीकरण करून तू समलैंगिक असल्याचे व्हायरल करतो, असे धमकावले. राकेशने विनवण्या केल्या. मात्र, टोळीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. कुटुंबाला अपघाताचे कारण सांगून ऑनलाइन पैसे मागायला लावले. राकेशच्या आईने त्याला ३ हजार रुपये पाठवताच जवळील पंपावरून आरोपींनी रोख काढून घेत पोबारा केला.

गाडीवरून काढला मागराकेशने याप्रकरणी रविवारी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांना हा प्रकार कळताच त्यांनी दौलताबादच्या निरीक्षक रेखा लोंढे, उपनिरीक्षक कृष्णा घायाळ यांना तपासाच्या सूचना केल्या. आराेपींच्या दुचाकीच्या वर्णनावरून शोध सुरू केला. त्यात दुचाकी वडगाव कोल्हाटी परिसरातील असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरून उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, सहायक फौजदार पाटेकर, अंमलदार कैलास जाधव, महेश घुगे, ज्ञानेश्वर कोळी, अविनाश बरवंट यांनी आराेपींचे घर गाठत राहुल राजू खांडेकर (२०), आयुष संजय लाटे (२१), शिवम सुरेश पवार (२४, सर्व रा. वडगाव कोल्हाटी) यांना अटक केली.

पाच पीडित निष्पन्न, प्रत्यक्षात अनेकराहुल बीएस्सी, आयुष, शिवम नर्सिंगचे विद्यार्थी आहेत. सध्या चार तक्रारदार समोर आले आहेत. प्रत्यक्षात टोळीने ॲपद्वारे अनेकांना लुटले असावे. फसलेल्यांनी समोर यावे, त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल. नागरिकांनी अशा फसव्या ॲपवर विश्वास ठेवू नये.-उपायुक्त नितीन बगाटे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर