शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जेवण करून परत निघालेल्या तरूणांवर काळाचा घाला; चुलत भावांसह तिघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:29 IST

कार दुभाजकावर आदळून उलटली आणि क्षणार्धात समोरचा भाग चक्काचूर झाला.

फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर) : जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर बिल्डा गावाजवळील पुलानजीक सोमवारी रात्री ११ वाजता भीषण अपघात घडला. कार दुभाजकाला धडकून पलटी झाली. या अपघातात दोन चुलत भावांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, एमएच २० ईजे १५८७ क्रमांकाची कार फुलंब्रीहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना बिल्डा गावाजवळील पुलानजीक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार दुभाजकावर आदळून उलटली आणि क्षणार्धात समोरचा भाग चक्काचूर झाला. मृतांमध्ये पिंप्री राजा येथील अरफात अशिफ बागवान (१७), रेहान जमील बागवान (१६) आणि रोशन गेट येथील सय्यद मारुफ सय्यद माजीद (१८) यांचा समावेश आहे. हे तिघेही चुलत भाऊ व मित्र असून छत्रपती संभाजीनगरच्या मोतीलाल नगर परिसरात शिक्षण घेत होते.

अपघातात उजेर खान व शरीफ शेख हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातावेळी सर्व युवक फुलंब्री येथे जेवणासाठी आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सहाणे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना त्वरित रुग्णालयात हलविले आणि अपघातग्रस्तांची मदत केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघातDeathमृत्यू