तरुणाई आज थिरकणार
By Admin | Updated: November 30, 2014 01:00 IST2014-11-30T00:30:33+5:302014-11-30T01:00:32+5:30
औरंगाबाद : औरंगाबादमध्येही मोठ्या शहरांतील ‘कल्चर’ रुजत आहे. हे गेल्या काही महिन्यांमध्ये तरुणांसाठी होणाऱ्या विशेष पार्ट्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे.

तरुणाई आज थिरकणार
औरंगाबाद : औरंगाबादमध्येही मोठ्या शहरांतील ‘कल्चर’ रुजत आहे. हे गेल्या काही महिन्यांमध्ये तरुणांसाठी होणाऱ्या विशेष पार्ट्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे. हीरो मोटार्स, एस.एस. प्रो इव्हेंटस् व नॉर्दन प्रोच्या वतीने प्रायोजित सनबर्न गोवा प्री- पार्टीमध्ये सागर लॉन्स येथे आज ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. तरुणाई मनमुरादपणे थिरकणार आहे.
गोव्यामध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलची प्री- पार्टी म्हणून येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यामध्ये दरवर्षी सनबर्न फेस्टिव्हल आयोजित केला जातो. देशभरात नावाजलेल्या या कार्यक्रमात लेडी डी जे कँडीस रेडिंग यांच्या तालावर तरुणाईला मनमुराद नृत्य करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. तरुणांसाठी विशेष पार्ट्या दिल्ली, मुंबई, गोवा, कोलकाता इ. मोठ्या शहरांमध्ये होत आहेत. शहरातील तरुणांना बाहेर जाण्याची गरज पडू नये म्हणून सनबर्न गोवा प्री- पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरामध्ये गेल्या सहा महिन्यांत तरुणांसाठी अशा पार्ट्या अनेक वेळा झाल्या आहेत. कार्यक्रमाचे सहप्रायोजक लोकमत टाइम्स आहे.
हॉटेल ग्रीन पार्कतर्फे फूड आणि बेवरेजेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कार्यक्रमाचे सहयोगी स्पॉन्सर सेठिया क्रिएशन तसेच हायात हे प्रमोशनल स्पॉन्सर आहेत. आज ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून सागर लॉन्स, ए.पी.आय. कॉर्नर येथे तिकिटे मिळणार आहेत.