सारणीच्या तरुणांनी घेतला स्वच्छतेचा वसा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:41 IST2017-08-06T00:41:15+5:302017-08-06T00:41:15+5:30
सारणी (आनंदगाव) येथील तरुणांनी संतोष सोनवणे व बप्पासाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे गावात दर रविवारी स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प केला आहे

सारणीच्या तरुणांनी घेतला स्वच्छतेचा वसा !
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : तालुक्यातील सारणी (आनंदगाव) येथील तरुणांनी संतोष सोनवणे व बप्पासाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे गावात दर रविवारी स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सर्व तरुणांनी एकत्र येऊन आधार ग्रुपची स्थापना केली आहे. ग्रुपच्या माध्यमातून शुक्रवारी गावातील कचरा कुंड्यांमधील जवळपास तीन ट्रॅक्टर घाण व कचरा गावाबाहेर काढला आहे.
गुरुवारी संध्याकाळी या संदर्भात ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. शुक्रवारी सकाळी गावात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी ४० तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत गावातील कचराकुंड्या साफ केल्या. सकाळी ८ ते १० या वेळेत तरुणांनी अर्ध्या गावातील घाण व कचरा मिळून तीन ट्रॅक्टर गावाबाहेर टाकले. उर्वरित गावातील कचरा रविवारी काढण्यात येणार असून हे काम यापुढे अखंडपणे आधार ग्रुप करणार असल्याची माहिती आधार ग्रुपचे प्रमुख संतोष सोनवणे यांनी दिली.
या उपक्रमात देविकांत सोनवणे, प्रीतम खरात, अनिल सोनवणे, आशिष सोनवणे, विकास सोनवणे, वैभव सोनवणे, महेश सोनवणे, दत्ता सोनवणे, अशोक सोनवणे, अजिंक्य सोनवणे, संजय सोनवणे, गणेश शिवाजी सोनवणे, योगानंद सोनवणे, रामधन पुरी, सिद्धेश्वर सोनवणे, सिद्धेश्वर पुरी, विशाल सोनवणे, विकास बप्पा सोनवणे, शामसुंदर सोनवणे, उत्तरेश्वर सोनवणे, आबा सोनवणे, दादा पुरी, अजिंक्य सोनवणे, अरुण सोनवणे, गणेश सोनवणे, संभाजी सोनवणे, लखन सोनवणे, सुसेन सोनवणे, श्रीहरी काळे, बाळू सोनवणे यांच्यासह अनेक तरुण तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.