त्रिकोळीत येथे युवकाची आत्महत्या

By Admin | Updated: August 4, 2014 00:50 IST2014-08-04T00:35:43+5:302014-08-04T00:50:09+5:30

उमरगा : तालुक्यातील त्रिकोळी येथील एका युवक शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली़

Youth suicide in Trilolat | त्रिकोळीत येथे युवकाची आत्महत्या

त्रिकोळीत येथे युवकाची आत्महत्या

उमरगा : तालुक्यातील त्रिकोळी येथील एका युवक शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली़ दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी त्याने आत्महत्या केली नसून, त्याचा खून केल्याचा आरोप केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता़ या प्रकणी उमरगा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिकोळी येथील नेताजी अण्णाराव मुगळे (वय-२३) हा युवक रविवारी सकाळी शेताकडे गेला होता़ त्याने शेतातील आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती सालगडी रत्नाकर पांडुरंग कुन्हाळे यांनी दिल्यावरून भागवत मुगळे यांच्या माहितीवरून उमरगा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर पोउपनि प्रविण हालसे, पोउपनि विश्वजीत कासले, पोकॉ किरण हावळे, पोकॉ चांद मेंडके, राजा जाधव, पोकॉ विश्वास वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली़ त्यावेळी नातेवाईकांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती़ (वार्ताहर)
खून झाल्याचा संशय !
मयताचे वडील अण्णाराव मुगळे यांनी आपला मुलगा नेताजीचा खून झाल्याचा संशय व्यक्त करीत तसा गुन्हा दाखल करून तपास करण्याची मागणी लावून धरली़ नेताजी याने रॉकेल आणून दिल्यानंतर वडिलांना सांगून शेताकडे गेला होता़ एकुलत्या एक नेताजीस वीस एकर शेती आहे़ त्याच्यावर कोणाचे कर्ज नाही, बहिणीचे लग्न झाले आहे़ त्यामुळे तो आत्महत्या करू शकत नाही, त्याचा कोणीतरी खून केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला़ सहाय्यक पोलिस अधीक्षक एम़राकेशकुमार कलसागार घटनास्थळी येईपर्यंत त्यांनी प्रेत उतरवू दिले नाही़
अधिकाऱ्यांची धाव
त्रिकोळीत तणाव निर्माण झाल्यानंतर एम़राकेशकुमार कलासागर, पोनि निकाळजे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ पंचनामा करून दुचाकीची व परिसराची पाहणी केली़
अहवालानंतर कारवाई
पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक एम़राकेशकुमार यांनी दिली़

Web Title: Youth suicide in Trilolat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.