सातारा परिसरात हेल्मेटधारी तरुणाने महिलेचे मंगळसूत्र पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 16:12 IST2018-08-24T16:10:43+5:302018-08-24T16:12:02+5:30
सातारा परिसरातील संग्राम नगर येथे दुचाकीवर आलेल्या हेल्मेटधारी तरुणाने महिलेचे मंगळसूत्र पळवले.

सातारा परिसरात हेल्मेटधारी तरुणाने महिलेचे मंगळसूत्र पळवले
औरंगाबाद : सातारा परिसरातील संग्राम नगर येथे दुचाकीवर आलेल्या हेल्मेटधारी तरुणाने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेखा राजेंद्र ढाले या आज दुपारी सातारा परिसरातील संग्राम नगर येथील बीएसएनएल कार्यालयाच्या मार्गावरून जात होत्या. यावेळी अचानक एक हेल्मेटधारी तरुण विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आला आणि त्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका देत पळवून नेले. मंगळसूत्र दीड तोळे सोन्याचे असल्याची माहिती ढाले यांनी दिली आहे. या प्रकरणी सातारा पोलीस पुढील तपास करत आहेत.