विद्यापीठात भरणार कलाविष्कारांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:31 IST2017-10-29T00:31:12+5:302017-10-29T00:31:23+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला रविवारपासून सृजनरंग रंगमंचावर सुरुवात होणार आहे.

Youth festival from sunday in University | विद्यापीठात भरणार कलाविष्कारांचा मेळा

विद्यापीठात भरणार कलाविष्कारांचा मेळा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला रविवारपासून सृजनरंग रंगमंचावर सुरुवात होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते होईल. शनिवारपासून ते बुधवारपर्यंत महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा कलाविष्कार पाहायला मिळणार आहे.
विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव प्रत्येक वर्षी घेण्यात येतो. मागील वर्षी हा युवक महोत्सव तुळजापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात झाला होता. यावर्षी विद्यापीठ परिसरातच होत
आहे.
हा महोत्सव ऐन दिवाळीच्या सुट्यांमध्येच आयोजित केल्यामुळे पुरेशी वातावरणनिर्मिती झालेली नाही. अनेक विद्यार्थी अद्यापही गावाहून परतलेले नाहीत. यामुळे महोत्सवाला एक दिवस उरला असतानाच केवळ विद्यार्थी कल्याण संचालक विभागातच तयारीची धामधूम सुरू होती. या महोत्सवात विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचा-यांनी यावेळी अलिप्त राहणेच पसंत केले आहे. केवळ विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजिब खान यांची मित्रमंडळी महोत्सवाच्या यशस्वी नियोजनासाठी प्रयत्न करीत
आहे.
महोत्सवात सहभागी होण्यासाठी दोनशेपेक्षा अधिक महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी किती संघ प्रत्यक्ष सहभागी होतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जेवण कंत्राटाचा शेवटपर्यंत गोंधळ
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातून येणाºया २ हजार कलाकारांच्या राहण्याची व्यवस्था विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहात करण्यात आली आहे; मात्र या सर्वांना नाश्ता, चहासह दुपार आणि संध्याकाळच्या जेवणासाठी निविदा मागविल्या होत्या; मात्र केवळ दोनच निविदा आल्या.
या दोन्ही निविदा एकाच व्यक्तीने टाकल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कुलगुरूंनी विश्रामगृहातील खानावळ चालकाला कलाकारांचे जेवण बनविण्याचे आदेश दिले; मात्र काही विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी हस्तक्षेप करीत त्याच निविदाधारकांना कंत्राट देण्यास भाग पाडल्याचे
समजते.

Web Title: Youth festival from sunday in University