शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

वडील दारू पिऊन आईशी भांडायचे म्हणून तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: December 28, 2015 00:27 IST

औरंगाबाद : वडील दारू पिऊन आईशी भांडायचे. याचा खूप त्रास व्हायचा म्हणून एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

औरंगाबाद : वडील दारू पिऊन आईशी भांडायचे. याचा खूप त्रास व्हायचा म्हणून एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुंडलिकनगरातील गल्ली क्रमांक आठमध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली. योगेश संतोष घुले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, योगेशचे मूळ गाव नेवासा तालुक्यात आहे. त्याचे आई-वडील कामानिमित्त औरंगाबादेत स्थायिक झालेले आहेत. वडिलांसोबत योगेशही मजुरी करायचा. त्याने शिक्षण अर्धवट सोडलेले आहे. रविवारी दुपारी योगेशची आई कंपनीत कामावर गेली. तर, वडीलही मजुरीसाठी गेले असताना योगेशने राहत्या घरात गळफास घेतला. घटनेची माहिती पुंडलिकनगर पोलीस चौकीला मिळाल्यावर फौजदार अरुण घोलप, पोलीस नाईक कारभारी गाडेकर यांनी मृतदेह घाटीत दाखल केला. आत्महत्येपूर्वी योगेशने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली. त्यात वडील दारू पिऊन आईशी सतत भांडत असत. त्यांच्या नेहमीच्या वादाचा मला खूप त्रास व्हायचा म्हणून मी आत्महत्या करीत आहे, असे नमूद केले आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.फौजदाराचा हलगर्जीपणा...पुंडलिकनगर भागात तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती पोलीस चौकीला मिळाल्यावर घटनास्थळी जाण्यासाठी ठाणे अंमलदार सोनवणे यांनी सहायक फौजदार मोकळे यांना फोन केला. मोकळे यांनी तब्येत ठीक नसल्याचे सांगितले. त्यावर ही माहिती पोलीस निरीक्षक आसाराम जाहरवाल यांना देण्यात आली. त्यांनी मोकळे यांना पुन्हा फोन करण्यास सांगितले. मात्र त्यानंतर त्यांचा मोबाईल स्वीचआॅफ असल्याचे सांगण्यात येत होते. मोकळे यांच्या हलगर्जीपणाबाबत ठाण्याच्या डायरीत नोंद करण्यात आली आहे.