धनगर आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 04:59 IST2018-08-05T04:59:01+5:302018-08-05T04:59:17+5:30

बालानगर (ता. पैठण) येथील तरुणाने धनगर आरक्षणासाठीच आत्महत्या केली आहे.

Youth commits suicide for Dhangar reservation | धनगर आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

धनगर आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

जायकवाडी/ बालानगर (जि. औरंगाबाद) : बालानगर (ता. पैठण) येथील तरुणाने धनगर आरक्षणासाठीच आत्महत्या केली आहे. त्याच्याजवळ आरक्षणासाठीच आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी सापडली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात तशी नोंद करण्यात यावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली.
शुक्रवारी परमेश्वर बबन घोंगडे (२२) याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा चुलतभाऊ प्रभाकर घोंगडे यांच्या फिर्यादीवरून पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नसल्याचे शुक्रवारी सांगितले होते.
शनिवारी कुटुंबीयांसह धनगर आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. परमेश्वरने एका ओळीच्या चिठ्ठीत धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी सांगितले. आरक्षण नसल्याने मुलाने आत्महत्या केल्याचा जबाब परमेश्वरची आई द्वारकाबाई, वडील बबन यांनी शनिवारी नोंदविला.

Web Title: Youth commits suicide for Dhangar reservation