शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मित्राचा खात्माकरून खुनी पोलीस ठाण्यात हजर; दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 19:05 IST

झटापटीत दोघेही गंभीर जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला

औरंगाबाद : रेकॉर्डवरील गुन्हेगाराला चाकूने भोसकून मारणारा आरोपी थेट जिन्सी पोलीस ठाण्यात पोहोचल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यात जखमीचा रस्त्यावर जास्त रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिन्सीचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी दिली. ही घटना बायजीपुऱ्यात घडली.

शेख शाहरुख शेख अन्वर (१७ वर्ष ६ महिने, रा. इंदिरानगर, बायजीपुरा, ग.नं. ३०) असे मृताचे नाव आहे. हैदर खान उर्फ शारेख जाफर खान (२२, रा. संजयनगर, ग.नं.सी ११) असे मारणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत शाहरुख आणि हैदर दोघे मित्र होते. रविवारी मध्यरात्री बायजीपुऱ्यातील सिकंदर हॉल समोरील सार्वजनिक रोडवर हैदरने शाहरुखवर सपासप चाकूचे वार केले. शाहरुखच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला. 

दोघांच्या झटापटीत आरोपी हैदरच्याही पोटाला चाकू लागला. तो जखमी अवस्थेतच जिन्सी ठाण्यात पोहोचला. त्याचे कपडे, चप्पल रक्ताने भिजलेली होती. त्यास जिन्सी पोलिसांनी घाटी रुग्णालयात पाठवले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शाहरुखलाही पोलिसांनी रिक्षामधून घाटीत पाठवले. उपचार सुरू असताना शाहरुखचा काही वेळातच मृत्यू झाला. मृताच्या मामा पठाण जावेद पठाण खालेद यांच्या तक्रारीवरून उपनिरीक्षक अनंता तांगडे यांनी हैदरविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला. अधिक तपास निरीक्षक राजेश मयेकर करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू