फसवणुकीच्या गुन्ह्यात तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST2020-12-17T04:30:34+5:302020-12-17T04:30:34+5:30

अक्षय चंद्रशेखर घोरपडे (वय २५, रा. शिलनिमानी, ता. खामगाव, जि. बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार अभिजित केशव कांबळे ...

Youth arrested for cheating | फसवणुकीच्या गुन्ह्यात तरुणास अटक

फसवणुकीच्या गुन्ह्यात तरुणास अटक

अक्षय चंद्रशेखर घोरपडे (वय २५, रा. शिलनिमानी, ता. खामगाव, जि. बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार अभिजित केशव कांबळे यांची मे २०१७ ते १८ मार्च २०२० दरम्यान मतदार स्मार्टकार्ड योजनेचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपी अक्षय आणि संतोष देवाजी सातदिवे (रा. औरंगाबाद) यांनी १० लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा म्हसवड ठाण्यात दाखल झाला होता. आरोपी पोलिसांना सापडत नव्हते. दरम्यान, तो औरंगाबादेतील न्यू बालाजीनगरात राहत असल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस उपनिरीक्षक रवी डोईफोडे, प्रदीप जाधव यांचे पथक शहरात दाखल झाले. जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक दत्तात्रेय बोटके, माणिक हिवाळे यांनी तपास करून आरोपीस अटक केली.

Web Title: Youth arrested for cheating