शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रील्सच्या नादात कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू; गाडी चालविण्यास देणाऱ्या मित्राविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 18:16 IST

रील्स शूट करताना कार रिव्हर्स गियरमध्ये मागे जात खोल दरीत कोसळून तरुणीचा झाला मृत्यू

खुलताबाद: सुलीभंजन दत्तधाम मंदीर परिसरात रिल्स काढण्याच्या नादात कार डोंगरच्या दरीत कोसळून भीषण अपघातात तरूणीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात मयत तरूणीसोबत असलेल्या युवकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी युवकाला अटक केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत तरूणी श्वेता हिचा भाऊ मनिष सरोसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुरज संजय मुळे याने श्वेता हिस छत्रपती संभाजीनगर शहरापासून ४० किमी लांब डोंगरावर नेले. येथे सूरजने श्वेताला कार चालविता येत नाही हे माहिती असूनही कार ( क्रंमाक एम एच २१ बीएच ०९५८) चालविण्यास दिली. यानंतर रिव्हर्स गिअरमध्ये कार मागे जात दरीत कोसळून श्वेताचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. श्वेताच्या मृत्यूला सूरज हाच कारणीभूत व जबाबदार आहे. या फिर्यादीवरून खुलताबाद पोलीसांनी कलम ३०४ अ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून सूरज मुळे यास अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोरे हे करत आहे. 

सकाळी झाले शवविच्छेदनदरीतून श्वेता सरोसेचा मृतदेह सांयकाळी खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. मात्र, श्वेताच्या नातेवाईकांना सांयकाळनंतर घटना माहिती झाली. त्यानंतर जवळपास ७ वाजता तिचा भाऊ मनिष सुरवसे खुलताबाद रूग्णालयात आला. तोपर्यंत श्वेता हिचा मृत्यू झाला असल्याचे त्याला सांगण्यात आले नव्हते. त्यानंतर इतर मित्र नातेवाईक दाखल आले. दरम्यान, रात्री शवविच्छेदन होऊ शकले नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी १० वाजेनंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर श्वेताचे नातेवाईक गुन्हा दाखल करण्यासाठी खुलताबाद पोलीस ठाण्यात गेले. दुपारी २ वाजेच्या आसपास गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर मृतदेह घेवून नातेवाईक छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले.

कार दोन वेळेस खडकावर आदळलीसुरजने श्वेताला गियर टाकून एक्सलेटर दाबायला सांगितले. मात्र, गाडी रिव्हर्समध्ये जाऊन वेगात मागे गेली व डोंगरावरून दरीत कोसळली. दरीतील खडकावर दोनवेळेस कार आदळून श्वेता कारच्या बाहेर फेकली गेली. त्यात श्वेता दगडांवर आदळून गंभीर जखमी झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार यात श्वेताच्या शरीरातील बहुतांश हाडे मोडली असावीत. घटनेनंतर पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतले. रात्री उशिरा श्वेताचा मृतदेह घाटीत शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आला.

श्वेताचे कुटुंब मूळ मुंबईचेश्वेताचे कुटुंब मूळ मुंबईचे रहिवासी असून काही महिन्यांपूर्वीच ते शहरात स्थायिक झाले होते. हनुमाननगर च्या गल्ली क्रौ २ मध्ये श्वेताचे कुटुंब राहते तर सूरज गल्ली १ मध्ये राहतो. सकाळी दोघेच त्याच्या मामाच्या कारने निघाले होते. पदवीपर्यंत शिक्षण झालेली श्वेता एका खासगी बँकेत नोकरी करत होती. कुटुंबात सर्वांत लहान असलेल्या श्वेताची मोठी बहीण विवाहित असून वडील व मोठा भाऊ खासगी नोकरी करतात.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादSocial Mediaसोशल मीडिया