लातूर : थर्टी फर्स्ट दारू पिऊन साजरा करण्याचे फॅड वाढत असले, तरी लातूरच्या तरुणाईने नूतन वर्षाचे स्वागत संकल्प घेऊन करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत बिअर बार व मद्यविक्रेत्यांना परवानगी देणे हे शासन-प्रशासनाचे चुकीचे असल्याचे मत ८९ टक्के तरुणांनी 'लोकमत सर्व्हेक्षणा'त व्यक्त केले आहे. शिवाय, दारू पिऊन नूतन वर्षाचे स्वागत करणे गैर असल्याचे मतही ८८ टक्के तरुणाईने या सर्व्हेक्षणात व्यक्त केले आहे.दरवर्षी थर्टी फस्र्ट साजरा केला जातो. सामाजिक उपक्रम किंवा विकासाचे संकल्प समोर येत नाहीत. दारू पिऊन नूतन वर्षाचे स्वागत करण्याच्या उपक्रमाला खतपाणी घातले जाते. असे स्वागत करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात तरुणाईचा मोठय़ा प्रमाणात सहभाग राहतो. त्यामुळे 'लोकमत'ने 'नूतन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करावे का?' असा थेट सवाल प्रश्नावलीद्वारे कॉलेजियन्समधील तरुणाईला केला. यावर दारू पिऊन नूतन वर्षाचे स्वागत करणे गैर आहे.नशेत संकल्पपूर्तीचा पहिला दिवस घालविणे म्हणजे वेळ खर्च करणे आहे. वेळ कोणासाठीही थांबत नाही. वेळ कोणाचाही गुलाम नसतो. जो वेळेची कदर करतो, वेळही त्यांची कदर करीत असते, असा विचार तरुणाई करते आहे, हे 'लोकमत'च्या सर्व्हेक्षणातून समोर आले. नूतन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करू नये, असे मत ८८ टक्के तरुणांनी या सर्व्हेक्षणात व्यक्त केले आहे. राज्य शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला उद्दिष्ट असते. या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने थर्टी फस्र्टच्या निमित्ताने रात्री उशिरापर्यंत बिअरबार व दारू दुकाने खुले ठेवण्यास परवानगी दिली, हे चुकीचे आहे, असे मतही ८९ टक्के तरुणाईने व्यक्त केले आहे. शुल्क मिळते म्हणून नवीन वर्षाचा हा उपक्रम राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चुकीचाच आहे. वास्तविक पाहता नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला असा उपक्रम राबवायला नको आहे, असे मतही तरुणाईने व्यक्त केले. लातूर शहरातील १00 मुलांपैकी ८९ मुलांनी रात्री उशिरापर्यंत बिअरबार व दारू दुकाने सुरू ठेवण्यास विरोध दर्शविला. १00 मुलांपैकी ८८ मुलांनी नूतन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करणे चुकीचे असल्याचेही मत व्यक्त केले आहे. 89% योग्य आहे 11% योग्य नाही
■ थर्टी फर्स्टला रात्री उशिरापर्यंत बिअरबार खुले ठेवणे योग्य आहे? 12% योग्य आहे योग्य नाही 88%
■ नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करणे योग्य आहे का?