नांदर येथे बंधाऱ्यात तरुण बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:04 IST2021-09-23T04:04:26+5:302021-09-23T04:04:26+5:30
बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान गावाशेजारील विरभद्रा नदीवरील सिमेंट बंधाऱ्यात मनोज बाळू काळे व कार्तिक दत्तात्रय काळे (२२) या दोघांनी ...

नांदर येथे बंधाऱ्यात तरुण बुडाला
बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान गावाशेजारील विरभद्रा नदीवरील सिमेंट बंधाऱ्यात मनोज बाळू काळे व कार्तिक दत्तात्रय काळे (२२) या दोघांनी पोहण्यासाठी उड्या मारल्या. दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर आलेला होता. यामुळे या दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. दोघेही पाण्यात बुडू लागले. त्यातील कार्तिक काळे हा तरुण कसा बसा पाण्याबाहेर आला. व मनोज हा पाण्यात बुडत असताना त्याने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत मनोज हा पाण्यातील भोवऱ्यात अडकून दिसेनासा झाला. आरडाओरड ऐकून गावातील नागरिकांनी धाव घेतली. यातील राजू पवार या तरुणाने जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी फेकली ; परंतु पाण्याचा वेग जास्त असल्याने नाईलाजाने दाेरीच्या साहाय्याने त्याला बाहेर यावे लागले.
या घटनेची माहिती पोलीस पाटील गोपाल वैद्य यांनी पाचोड पोलिसांना देताच सपोनि. गणेश सुरवसे, जमादार किशोर शिंदे, फेरोझ बरडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या मनोजचा शोध घेण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत प्रयत्न सुरु होते. घटनास्थळी जि.प. सदस्य कमलाकर एडके, सरपंच ॲड. किशोर वैद्य, प्रा. संदीप काळे, रेवणनाथ कर्डिले, आस्मानराव काळे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सहकार्य केले.
फोटो :
220921\img_20210922_183431.jpg
छाया : नांदर येथील विरभद्रा नदीवरील याच सिमेंट बंधार्यात मनोज बाळु काळे हा तरुण बुडाला असुन बंधार्यावर जमलेले गावकरी...( छाया : अंबादास एडके )