विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By | Updated: December 4, 2020 04:15 IST2020-12-04T04:15:08+5:302020-12-04T04:15:08+5:30

नागद : मध खाण्याचा मोह शिव तांडा येथील तरुणाच्या जिवावर बेतला आहे. सागाच्या झाडावर मध काढण्यासाठी चढल्यानंतर विजेच्या ...

Young man dies of electric shock | विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

नागद : मध खाण्याचा मोह शिव तांडा येथील तरुणाच्या जिवावर बेतला आहे. सागाच्या झाडावर मध काढण्यासाठी चढल्यानंतर विजेच्या तारेचा जोरदार धक्का बसून, त्याचा जागीच मृत्यू झाला. रितेश अर्जुन जाधव (१७), असे तरुणाचे नाव असून, ही घटना गुरुवारी घडली.

रितेश हा शेतातून बैलगाडी घेऊन घरी येण्यास निघाला होता. रस्त्यात त्याला सागाच्या झाडावर मोहळ दिसले. मध खाण्याची इच्छा अनावर झाल्याने बैलगाडी थांबवून मध काढण्यासाठी तो सागाच्या झाडावर चढला. झाडाजवळून गेलेल्या विजेच्या मुख्य तारेकडे त्याचे लक्ष गेले नाही व तारेला स्पर्श होऊन तो चिकटला. यात जोरदार धक्का बसून त्याचा झाडावरच मृत्यू झाला. बैलगाडीसोबत तो घरी आला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता, झाडावर तो लटकलेला आढळला. ग्रामस्थांनी वीजपुरवठा बंद करून त्याला खाली काढले. नागद प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. रितेशचे काका तसेच पोलीस पाटील मोतीराम लक्ष्मण जाधव यांच्या माहितीवरून या घटनेची नोंद नागद पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

पोलीस भरतीचे स्वप्न भंगले

मयत रितेश अर्जुन जाधव याचे पोलीस बनण्याचे स्वप्न होते. याकरिता तो तयारीही करीत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, मध खाण्यासाठी झाडावर चढणे त्याच्या जिवावर बेतले. रितेशच्या पश्चात आई-वडील, भाऊ, काका व काकू, असा परिवार आहे.

फोटो आहे.

Web Title: Young man dies of electric shock