छतावरून पडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:04 IST2021-06-20T04:04:01+5:302021-06-20T04:04:01+5:30

फुलंब्री : येथील विवेकानंद नगरात राहणाऱ्या एका तरुणाचा छतावरून पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ...

Young man dies after falling from roof | छतावरून पडून तरुणाचा मृत्यू

छतावरून पडून तरुणाचा मृत्यू

फुलंब्री : येथील विवेकानंद नगरात राहणाऱ्या एका तरुणाचा छतावरून पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

फुलंब्री शहरातील विवेकानंद नगरात राहणारा संदीप गोवर्धन चव्हाण (२०) हा सायंकाळी गच्चीवर गेला होता. काही वेळानंतर त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी संदीपला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पण नातेवाइकांनी शवविच्छेदन न करता मृतदेह मारसावळी येथे अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले. मारसावळी येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.

संदीप चव्हाण हा औरंगाबाद शहरातील एका महाविद्यालयात बी.एस्सी. तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे वडील गोवर्धन चव्हाण हे कापड व्यापारी असून तालुक्यातील मारसावळी हे त्यांचे मूळगाव आहे. मागील काही वर्षांपासून ते फुलंब्री शहरात राहतात. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद फुलंब्री पोलीस ठाण्यात झालेली नव्हती.

-

शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची चर्चा

संबंधित मुलाच्या घरासमोर काही मुले बॉल खेळत होती. बॉल त्याच्या घरावर गेला असल्याने तो बॉल आणण्यासाठी संदीप गच्चीवर गेला होता. लोखंडी गजाने त्याने बॉल काढण्याचा प्रयत्न केला असता, तो गज हायपॉवर विद्युत वहिनीला लागला. यात संदीपचा मृत्यू झाल्याची चर्चा विवेकानंद परिसरात सुरू होती. दरम्यान, या घटनेची माहिती फुलंब्री पोलिसांना देण्यात आली नाही. तसेच शवविच्छेदन केले नसल्याने संदीपचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला, हे समजणे अवघड झाले आहे.

190621\fb_img_1624116856424__01.jpg

मयत संदीप चव्हाण यांचा फोटो

Web Title: Young man dies after falling from roof