वाळूज एमआयडीसीत अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 20:31 IST2019-06-22T20:31:08+5:302019-06-22T20:31:34+5:30
अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वाळूज एमआयडीसीत अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार
वाळूज महानगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री वाळूज एमआयडीसीतील स्टरलाईट कंपनीसमोर घडली. प्रमोद बाबूसिंग राठोड असे मृताचे नाव आहे.
प्रमोद राठोड (२४) हा पुणे येथे केटरिंगचे काम करतो. तर मोठा भाऊ संजय हा कुटुंबासह बकवालनगर येथे वास्तव्यास आहे. प्रमोद हा दोन-तीन दिवसांपूर्वीच ४-५ दिवसांची सुटी घेवून बकवालनगर येथे आला होता. शुक्रवारी रात्री रांजणगाव येथून दुचाकीने (एमएच-२६, बीबी- १००२) बकवालनगर येथे घरी जात होता.
दरम्यान, स्टरलाईट कंपनी समोर रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. या त प्रमोद गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना मध्यरात्रीनंतर १२:१५ वाजेच्या सुमारास प्रमोदची प्राणज्योती मालवली.
या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोह. सुखदेव भागडे हे करीत आहेत.