विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:04 IST2021-06-28T04:04:16+5:302021-06-28T04:04:16+5:30
गेवराई बु. शिवारात नारायण राख यांची गट क्रमांक १०८ मध्ये शेती असून, रविवारी ते व त्यांचे दोन्ही मुले प्रल्हाद ...

विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
गेवराई बु. शिवारात नारायण राख यांची गट क्रमांक १०८ मध्ये शेती असून, रविवारी ते व त्यांचे दोन्ही मुले प्रल्हाद व शिक्षक बंडू राख हे पिकाला पाणी भरण्यासाठी गेले. दरम्यान, दुपारी चार वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे प्रल्हाद राख हे विहिरीवरील विद्युतपंप बंद करण्यासाठी गेले असता विजेचा शॉक बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना भाऊ व वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ प्रल्हादला आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पडून होता. संतप्त झालेल्या नातेवाइकांनी येथील डॉक्टरांबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रल्हाद राख यांच्या पार्थिवावर आज सोमवारी सकाळी गेवराई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.
270621\img_20210627_192117.jpg
विजेचा शॉक लागून तरूण शेतकऱ्याचा मृत्यू