कब्रस्थानमध्ये अंत्यसंस्कारासाठी जावे लागते पाण्यातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:04 IST2021-09-23T04:04:16+5:302021-09-23T04:04:16+5:30
ताजनापूर गावची लोकसंख्या तीन हजारांवर असून, या गावात किमान चाळीसपेक्षा जास्त घरे मुस्लिमांची आहे. मुस्लिम समाजाचे कब्रस्थान ...

कब्रस्थानमध्ये अंत्यसंस्कारासाठी जावे लागते पाण्यातून
ताजनापूर गावची लोकसंख्या तीन हजारांवर असून, या गावात किमान चाळीसपेक्षा जास्त घरे मुस्लिमांची आहे. मुस्लिम समाजाचे कब्रस्थान नदीपलीकडे आहे. मुख्य रस्त्यापासून ते कब्रस्थानपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास नदीपात्रातून, तसेच पुढील रस्त्यावरील चिखल तुडवीत जावे लागते. पावसाळ्यात एखाद्याचा मृत्यू झाल्यास नागरिकांचे मोठे हाल होते. मंगळवारी येथील बशीर पटेल यांचे निधन झाले. बुधवारी त्यांचे पार्थिव कब्रस्थानमध्ये नेण्यासाठी नागरिकांचे मोठे हाल झाले. रात्री पडलेल्या पावसामुळे नदीपात्रात पाणी आले होते. त्यामुळे चार फूट पाण्यातून नागरिकांनी प्रवास करून पटेल यांच्यावर अंत्यसंस्कार केले. कब्रस्थानमध्ये जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
फोटो : अंत्यसंस्कारासाठी चार फूट नदीच्या पाण्यातून जाताना नागरिक.
220921\screenshot_20210922-143203_whatsapp.jpg
ताजनापुर ता. खुलताबाद येथील मुस्लिम कब्रस्थान मध्ये जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे येथील नागरिकांना मोठा ञास सहन करावा लागत आहे